26 July 2021 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

Health First | आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी सुंठ

Benefits, Dry ginger, health article

मुंबई, ०८ मार्च: सुंठीवाचून खोकला गेला अशी म्हण आहे. म्हणजे सुंठ ही खोकल्यावर रामबाण औषध आहे. खोकला झाल्यास सुंठीचं सेवन केलं जातं, त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र याशिवायही सुंठीचे अनेक फायदे आहेत. खोकला, ताप, सांधेदुखी या समस्यांवर सूंठ फार उपयुक्त आहे. सुंठीचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात. (Benefits of dry ginger health article)

BhagyaVivah Marathi Matrimonial
 1. पोटासंबंधी आजार:
  गॅस, अपचन, अतिसार यांसारख्या इतरही पोटाच्या समस्यांसाठी सुंठेचा उपयोग केला जाऊ शकतो. सुंठेत अॅन्टी-इन्फ्लेमेन्टरी तत्व असतात, जे पोटाच्या समस्या ठिक करण्यासाठी मदत करतात. सुंठेच्या नियमित सेवनाने पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. सुंठेत असणारं अॅन्टी- इन्फ्लेमेन्टरी तत्व हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी करते.
 2. रोगप्रतिकारशक्ती:
  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठ फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांत इम्यून सिस्टम कमकुवत होते, परिणामी सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठेचा उपयोग करु शकता. खासकरुन थंडीच्या दिवसांत याचं सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करु शकतं.
 3. नैसर्गिक पेनकिलर:
  एका संशोधनानुसार, सुंठ एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुंठेमध्ये दुखणं कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा घेण्याचा सल्ला दिला जातो.
 4. डोकेदुखी:
  डोकेदुखीवरही सुंठ आराम देते. सुंठेमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे रक्ताभिसारण सुरळित होतं. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्याने आणि रक्ताभिसरण सुरळित होत असल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते.
 5. सुंठ खाल्ल्याने खूप भूक लागते.
 6. अजीर्णाची समस्या असल्यास सुंठ ताकात उगाळून प्यावी.
 7. घशात जळजळ आणि आंबट उलटी अशी आम्पपित्ताची लक्षणं असतील, तर सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखर समप्रमाण घेऊन खावं.
 8. आमवात म्हणजे सांध्याच्या ठिकाणी सूज आल्यास त्यावरही सुंठीचे सेवन फायदेशीर आहे.
 9. अर्धांगवायू असलेल्यांना सुंठ पूड, लसूण आणि तूप एकत्र करून घ्यावं.
 10. भोवळ, अर्धशिशी, डोकेदुखीची समस्या असल्यास सुंठ उगाळून त्याचा लेप लावावा.

 

News English Summary: So ginger is a panacea for cough. Ginger is consumed in case of cough, so we all know that it gives relief from cough. However, there are several benefits to using ginger. Ginger is very useful for cough, fever and joint pain. Let’s find out exactly what are the benefits of ginger.

News English Title: Benefits of dry ginger health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(642)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x