नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये काँग्रेसने ६०-७० वर्षात देशात काहीच केलं नाही असा दावा करत असतात. त्यात दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये तब्बल ३,००० कोटीच्या आसपास पैसा खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभ्या केल्याने अनेकांनी टीका सुद्धा केली. परंतु भाजपचे खासदार परेश रावल याच पुतळ्याच्या राजकारणावरून टीकाकारांना ट्विट करून उत्तर द्यायला गेले आणि अप्रत्यक्षपणे मोदींनाच तोंडघशी पाडलं आहे.

परेश रावल यांचं हे ट्विट अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या कामाचा पुरावा देणार आणि मोदींच्या दाव्याची पोलखोल करणारं ठरलं आहे. परेश रावल यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “यावर विश्वास बसत नाही की, ९९ शैक्षणिक संस्था, ६६ योजना, २६ खेळांचे चषक, १७ स्टेडिअम्स, ९ विमानतळ/बंदर, ४१ पुरस्कार, ३७ इस्पितळं, १७ राष्ट्रीय उद्यानं, ३७ मार्ग आणि १७ शिष्यवृतींचे गांधी नेहरूंच्या पाठीमागे नामकरण करून सुद्धा लोकांना एका पुतळ्याचा त्रास होत आहे, ज्याने देशाला एकसंघ ठेवलं”.

नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक भाषणात काँग्रेसने संपूर्ण राजवटीत काहीच विकासाची कामं केली नसल्याचा दावा करत असतात. गांधी घराण्याने देशावर सत्ता गाजवताना केवळ स्वतःचाच फायदा कसा करून घेतला हे सामान्यांना दाखवून देण्याचा त्यांचा नेहमीच केविलवाणा प्रयत्नं नजरेस पडतो. परंतु, देशात मूलभूत सुविधांवर पैसा खर्च करण्याऐवजी तो जेव्हा पुतळ्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याने, मोदींवर अनेक स्तरातून टीका करण्यात आली. दरम्यान, टीकाकारांच्या त्याच टीकेला त्यांच्याच पक्षातील खासदार आणि अभिनेते असलेले परेश रावल उत्तर देण्यास गेले खरे, परंतु त्या प्रश्नातून काँग्रेसच्या विकास कामांची थोडक्यात योग्य बाजू त्यांच्याकडून मांडली गेली आणि मोदींचा दावा अप्रत्यक्षरित्या फोल ठरवला अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

नेमकं काय ट्विट केलं होतं परेश रावल यांनी?

MP Paresh Rawal disclosed progress done by congress and indirectly slams narendra modi over statement of work done by congress in last 60 years