Health First | थंडीत गूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे | माहित आहेत का?

मुंबई, २१ डिसेंबर: प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषध म्हणून गुळाचा वापर होत आहे. भारतातील सर्वाधिक लोक जेवणानंतर गूळ खातात. गूळ हा चवीला गोड आहे, त्याचबरोबर तो पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतो. थंडीच्या दिवसात गूळ खाणे गरजेचे आहे, कारण गुळामुळे थंडीपासून संरक्षण होते. गुळामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं. प्राचीन काळात साखरेऐवजी गुळाचा वापर जास्त केला जायचा, कारण गूळ हा साखरेपेक्षा स्वस्त आणि खूप फायदेशीर आहे. यासोबत जेवणातही गोडी आणण्यासाठी अनेक घरांमध्ये गुळाचा वापर केला जातो.
थंडीमध्ये गूळ खाणे शरीरासाठी अंत्यत फायदेशीर मानले जाते. रिकाम्या पोटी गूळ खाणे फायदेशीर असते हे तर तुम्हाला माहीत असेल, पण गुळाचे पाणी पिणे हे देखील फायेदशीर असते, हे तुम्हाला माहित आहे का? गुळामध्ये नैसर्गिक शर्करा असते असे मानले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री झोपण्यापुर्वी गूळ खाणे पोटाच्या त्रासांपासून दूर ठेवते. डाएट फूडमध्ये गुळाचा समावेश असतो. थंडीत गूळ खाल्याने शरीराला आराम मिळतो. गुळामधील तत्व आरोग्यासाठी फायदेशीर असते.
काय आहेत नेमके फायदे:
सर्दी-पडसे:
थंडीमध्ये गूळ खाल्ल्यामुळे सर्दी-पडसे सारखे आजार दूर राहतात. गूळ हा उष्ण असतो जो शरीरात ऊर्जा निर्माण करतो आणि सर्दी-पडसे दूर ठेवतो. काळी मिरी आणि आल्यासोबत गूळ खाल्यास सर्दी पडसे होणार नाही.
हाडांची मजबुती:
गूळ खाणे हाडांच्या मजबुतीसाठी चांगले आहे. गुळामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे भरपूर प्रमाण असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
रक्त दाब:
रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी गूळ खाणे फायदेशीर आहे. रक्त दाब नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.
गुळामुळे त्वचा उजळते:
चेहऱ्यावरील डाग नष्ट करण्यासाठी गूळ खूप उपयुक्त आहे. गूळाचा नियमित वापर केल्याने चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होतात आणि चेहरा निखरतो.
रक्ताची कमतरता:
गुळामध्ये आयर्न (लोह) चे खूप प्रमाण आहे. शरीरातील लोहच्या कमतरतेमुळे अॅनिमियाचा त्रास होतो. गूळ खाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
श्वसनतंत्राचे कार्य सुरुळीत करते:
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण अनेक वैज्ञानिक अध्ययनात हे सिद्ध झाले आहे की, गुळाचे सेवन केल्याने श्वसनतंत्राचे कार्य सुरूळीत होते. खास करुन थंडीच्या दिवसांत नाक बंद होण्याची समस्या प्रकर्षाने जाणवते. अशावेळी गुळाचे सेवन केल्यास ब्रीदिंग सिस्टम मजबूत होते. गुळाला क्लींजिंग एजंट देखील म्हटले जाते कारण ते श्वसन प्रणाली, फुफ्फुस, अन्न नलिका, पोट आणि आतडे शुद्ध करते. गुळाचे सेवन केल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया देखील सहजतेने होते.
News English Summary: Jaggery has been used as an ayurvedic medicine since ancient times. Most people in India eat jaggery after meals. Jaggery is sweet in taste and also helps in smooth digestion. It is important to eat jaggery on cold days, as jaggery protects against cold. Jaggery is high in iron. In ancient times, jaggery was used more than sugar, as jaggery is cheaper and more profitable than sugar. In addition, jaggery is used in many homes to sweeten the food. Eating jaggery in the cold is considered to be extremely beneficial for the body. You know that eating jaggery on an empty stomach is beneficial
News English Title: Benefits of eating jaggery in winter season health article updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN