लस घेऊनही जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह | तर लस घेतलेल्या पोलीसाचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद, २१ फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलाय. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आलाय. फ्रंटलाईन वर्कर आणि वैद्यकीय कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे.
मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्ये वाढ हाेत असतानाच आता उस्मानाबादचे जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर हेही काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काेराेना लसीचा पहिला डाेस घेऊनही संसर्ग झाला असल्याने अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. त्यामुळे आता सर्वांनीच शासन तसेच प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सूचनांचे तंताेतंत पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन ते सध्या घरामध्येच विलगीकरणात आहेत. तिथूनच ते कार्यालयीन काम करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काेराेना लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतरही लागण झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अकारण घराबाहेर न पडता प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करावे. थाेडीबहुत लक्षणे आढळून आली तरी ती अंगावर न काढता तातडीने चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दिवेगाकवर यांच्या पत्नी प्रियंका बाेकील यांनाही काेराेनाचा संसर्ग झाला आहे.
दुसरीकडे औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. औरंगाबादेतील एका पोलिसांनं आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या पोलिसाला अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, अखेर उपचारादरम्यान त्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झालाय. भास्कर शंकर मेटे हे पोलीस हवालदार बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. सिटी स्कॅनमध्ये कोरोनाची लक्षणेही आढळली होती. आता हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. 13 फेब्रुवारीला कोरोना लसीचा पहिला डोस त्या पोलीस हवालदारानं घेतला होता, अखेर त्या पोलिसाचा मृत्यू झालाय.
News English Summary: While the number of cases of caries in the district has been on the rise for the last five-six days, now Osmanabad District Collector Kaistubh Divegavkar has also tested positive for caries. Notably, many questions are present as they became infected even after taking the first dose of the carina vaccine. Therefore, now there is a need for all to strictly follow the instructions being given by the government as well as the administration.
News English Title: Collector Kaustubh Diwegaonkar Covid positive even after vaccination news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER