5 March 2021 3:24 AM
अँप डाउनलोड

अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन जाहीर | जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहणार

Minister Yashomati Thakur, Announced lockdown, Amravati

अमरावती, २१ फेब्रुवारी: राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असेल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे. “सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी याचं पालन करावं. आम्हाला आता नाईलाजास्तव फक्त जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सारंकाही पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच शहरातील बाजार हे गाईडलाइन्सनुसारच सुरू राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.

 

News English Summary: State Minister for Women and Child Development Yashomati Thakur has made a big announcement. Amravati will have a lockdown next week. The lockdown has been declared for a week from 8 pm on Monday (February 22) in Amravati city, Achalpur city. This lockdown will be for seven days. This will be the first lockdown in the state after the unlock.

News English Title: Minister Yashomati Thakur has announced a lockdown in Amravati news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x