4 May 2025 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहे का ? - वाचा सविस्तर

Health benefits of masturbation

मुंबई, २३ जून | हस्तमैथुन ही प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत खाजगी बाब आहे. या बद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. खर तर हस्तमैथुन करने ही खूपच नैसर्गिक आणि सहज क्रिया आहे. हस्तमैथुन आपल्या लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगात ९५ टक्के पुरुष आणि ८९ टक्के महिला हस्तमैथुन करत असतात. एका सर्वे नुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कुठल्याही गोष्टीची अति ही दुर्गती करते यात काही शंकाच नाही पण प्रमाणात हस्तमैथुन केल्याने याचा शरीरावर कुठलाच विपरीत परिणाम होत नसतो. परंतु जर एखाद्याला हस्तमैथुन करण्याचे व्यसनच असेल तर त्यामुळे त्यांना भविष्यात बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

जाणून घेवूया प्रमाणात हस्तमैथुन केल्यास त्याचे त्याचे काय फायदे आहेत-

तणाव कमी करण्यास लाभदायक:
जगभरातील हेल्थ रिपोर्ट्सचा अभ्यासात असे समोर आले आहे की हस्तमैथुन लैंगिक तणाव नष्ट करायला मदत करते. हेल्थ प्रोफेशनल्सच्या माहिती नुसार आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणे ही खूप साधारण गोष्ट आहे. हस्तमैथुन करताना हृदयाची गती वाढते, रक्ताभिसरण वाढते, मांसपेशी मजबूत होतात. या सर्व शारीरिक प्रक्रियेबरोबरच तणावातून देखील मुक्तता भेटत असते. जशी सेक्स केल्यानंतर मिळत असते.

हस्तमैथुनाने मिळतो आनंद:
पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये ऑर्गझम ( चरमानंद) जास्त गुंतागुंतीचा असतो. पुरुष सामान्यतः आपले स्पर्म निघाल्यावर आनंदी होतात. परंतु अपूर्ण उत्तेजन आणि चुकीचा पध्दतीमुळे महिलांमध्ये ऑर्गझम कमी असतो. वेळेआधी स्पर्म निघणे अथवा फोरप्ले मधील कमतरतेमुळे महिलांचा आनंद कमी होत असतो. बऱ्याचदा यामुळे महिलांमध्ये हस्तमैथुना बद्दल गैरसमज आणि संभ्रमाची स्थिती निर्माण होते.

हस्तमैथुन एक नैसर्गिक प्रक्रिया:
हस्तमैथुन पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रजनन क्षमतेवर याचा कुठलाच प्रभाव पडत नसतो. अशक्तपणा येणे अथवा लैंगिकतेत कमतरता ह्या पुर्णपणे अफवा आहेत. मांजर, कुत्रे आणि माकडं हे देखील हस्तमैथुन करतात.

हस्तमैथुन करण्याची काय आहे मर्यादा?
आपल्यापैकी प्रत्येकालाच हा प्रश्न नेहमीच पडतो की नेमकी हस्तमैथुन करण्याची मर्यादा काय आहे? तर यावर उत्तर आहे हस्तमैथुन करायला कुठलीच ठराविक मर्यादा नाही. ते व्यक्ती व त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते की तो किती हस्तमैथुन करण्याची क्षमता बाळगतो. काही लोक रोज करतात, काही लोक आठवड्यातून, तर काही लोक महिन्यातून एकदा करत असतात.

परंतु डॉक्टरांच्या मते आठवड्यातून तीन वेळा हस्तमैथुन करण्यास काहीच हरकत नाही. फक्त प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे.

तर हे आहेत हस्तमैथुन करण्याचे काही फायदे पण जर एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त आणि हस्तमैथुन करण्याचे जर व्यसन असेल तर ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अपायकारक ठरू शकते. त्यामुळे आपली क्षमता ओळखूनच आनंद घ्या

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Health benefits of masturbation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या