22 October 2021 11:22 AM
अँप डाउनलोड

Benefits of Kantola Bhaji | ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी | आरोग्यदायी फायदे नक्की वाचा

Kantola Bhaji, Benefits

मुंबई, १९ सप्टेंबर : पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली, कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्वाद चाखा.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Benefits of Kantola Bhaji, ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, आरोग्यदायी फायदे नक्की वाचा – Health Benefits of Kantola Bhaji for Health in Marathi :

  • शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील phytochemicals घटक मदत करतात. सोबतच कॅन्सर, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.
  • मधुमेहींसाठीदेखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
  • करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प असतात.
  • करटोलीमध्ये फायबर आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते.
  • पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

Benefits of Kantola Bhaji for Health :

कशी कराल करटोलीची भाजी ? (Recipe for Kantola Bhaji )
बाजारातून ताजी हिरवीगार करटोली विकत घ्या. कारल्याप्रमाणे करटोलीदेखील चकत्यांमध्ये कापा. कांदा, टॉमेटोच्या फोडणीवर करटोली परतून वाफवा. यामध्ये आवडीनुसार हळद, मसाला, धने-जिर्‍याची पूड, मीठ, शेंगदाण्याचा कूट मिसळून भाजी बनवा.

करटोलीवरील आवरण काढू नका. त्यामध्ये अधिक पोषकघटक आहेत.

News English Summary: Kantola Bhaji Teasle gourd or spiny bitter gourd. This is a small egg-shaped vegetable, highly prized on the Indian subcontinent. It is prickly and green to yellow in colour, and having a long stem. It is not commonly available, and only during the rainy months. There is a wild variety, Momordica cochinchinensis, which is usually red in colour. The vegetable is rich in calcium, phosphorus, iron and carotene. They are either fried or included in fish or meat stews or served mashed with green chillis and mustard oil.

News Title: Benefits of Kantola Bhaji for Health in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(763)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x