29 April 2024 9:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आसाम: केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्या घरावर हल्ला; नातेवाईकाचं दुकान जाळलं

Union Minister Rameshwar Teli, Assam Violation, Citizenship Amendment Bill 2019

आसाम: केंद्रीय मंत्री आणि आसामचे खासदार रामेश्वर तेली यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएबी) आसाम’च्या संस्कृती आणि भाषेला प्रभावित करणार नाही, असे प्रतिपादन करताना गुरुवारी आसाममध्ये शांतता राखण्याचे जाहीर आवाहन केले. संसदेने सिटिझरशिप (दुरुस्ती) विधेयक मंजूर केल्यावर मोठ्या प्रमाणावर ईशान्येकडील राज्यांत निदर्शने झाल्याचे पडसाद आसाममधील दिब्रूगड येथे देखील उमटले आणि त्यांच्या निवासस्थानी देखील मोठ्याप्रमाणावर दगडफेक करण्यात आली असून त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचं दुकान देखील जाळून टाकण्यात आल्याचं ते म्हणाले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मी डिब्रूगडमध्ये राहतो. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर संतप्त आंदोलक आले आणि माझ्या काकांच्या दुकानात आग लावली. तसेच माझ्या सुरक्षारक्षक असतात त्याठिकाणी देखील जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी आमच्या घराला लागून असलेली भिंत देखील तोडून टाकली आणि आमच्या घरावर जोरदार दगडफेक देखील केली, ज्यामुळे खिडक्यांच्या काचा देखील तुटल्या आहेत. त्यानंतर त्यांनी हल्लेखोरांनी मोर्चा माझा वाहनांकडे वळवला आणि वाहनांना देखील आग लावण्याचा प्रयत्न केला, ”असं केंद्रीय मंत्री एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.

पुढे दिब्रुगडचे खासदार तेली म्हणाले की, सरकार आसामविरोधात काहीही करणार नाही. “ते लोक तेच आहेत, ज्यांनी काही दिवसांपूर्वी माझ्यावर फुले फेकली. ते आमचे लोक आहेत. त्यामुळे शांतता पूर्ववत व्हावी, असं आवाहन मला लोकांना करायचं आहे. मी आसामी आहे आणि मी असे काहीही करणार नाही जे आसामच्या लोकांना त्रासदायक ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक (कॅब) मंजूर झाल्यानंतर झालेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर आसाम’मधील सर्वात मोठे शहर गुवाहाटी आणि डिब्रूगड पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी आंदोलकांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, आर्मीच्या ५ तुकड्या आसाममध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

 

Web Title:  Assam MP and Union Minister Rameshwar Teli Citizenship Bill Will Not Affect Culture Language of Assam People Should Maintain Peace

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x