20 April 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा

Ajwain water, cold and cough, Health Fitness, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : निरोगी आहार, व्यायाम आणि वेळेवर झोपणं या अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. नित्यकर्माच्या व्यतिरिक्त काही अश्या गोष्टी आहे, ज्या आपल्या रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट बनवून आपल्याला आजारापासून वाचवतं. आज आम्ही आपल्याला असे एक प्रभावी उपाय सांगत आहोत, ज्यामुळे आपण आपले फ्लू 4 ते 5 दिवसात सहजच बरे करू शकता, तर यामुळे आपली प्रतिकारक शक्ती देखील बळकट होणार.

ओव्याचे गुणधर्म:
ओव्यामध्ये पोषक घटक भरपूर असतात. जे शरीरास निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतं. ओव्यांमध्ये अँटी-इंफ्लेमेट्री, अँटी-बैक्टीरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात.

साहित्य:

  • 1 /2 चमचा ओवा,
  • 5 तुळशीची पानं,
  • 1 /2 चमचा काळी मिरपूड,
  • 1 मोठा चमचा मध.

कृती:
एका भांड्यात 1 ग्लास पाणी, ओवा, काळीमिरी आणि तुळशीचे पानं घाला. पाण्याला 5 मिनिटे चांगली उकळी येऊ द्या. गॅस बंद करा. यामध्ये मध टाकण्यापूर्वी या मिश्रणाला थंड होऊ द्या. काढ्याला चांगल्या प्रमाणे ढवळा आणि पिऊन घ्या.

या काढ्याचे फायदे:

  • ओवा गुणधर्माने समृद्ध आहे. जेव्हा काळीमिरी, तुळस, मध घालून हा काढा तयार केला जातो तर या मधील गुणधर्म वाढतात. फ्लू पासून सुटका मिळविण्यापासून तर ओव्याचा काढा इतर त्रासापासून देखील सुटका देतो.
  • पोटाच्या आजारापासून सुटका
  • सर्दी पडसं आणि खोकल्यापासून सुटका
  • हिरड्यांच्या सुजे पासून सुटका
  • पाळीच्या वेदनेपासून सुटका
  • मुरुमांपासून सुटका

या गोष्टी लक्षात असू द्या:
एका दिवसात जास्त प्रमाणात ओव्याचे सेवन करणं त्रासदायक होऊ शकतं, म्हणून या काढ्याला दिवसातून एकदाच प्यावं. तर बाळाला दूध पाजणाऱ्या आईने आणि गरोदर बाईने याचे सेवन करू नये.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

 

News English Summary: Ajwain is one Ayurvedic staple that has been used for a bevy of cooking and healing purposes. Its active compounds are said to do wonders for digestion. A healthy digestion is intimately tied with weight loss too. Also known as carom seeds, ajwain is used to alleviate gas, flatulence and curbs bloating. Some studies have also claimed that the herb may even help manage high blood pressure levels. Another very common use of this herb is in kadhas concoction to soothe cold and cough.

News English Title: Immunity booster drink this healing Ajwain water to soothe cold and cough Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x