2 May 2025 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Horoscope Today

Horoscope Today | आजच्या राशिभविष्यनुसार एकूण 4 राशींना धनदाभाची त्याचबरोबर प्रमोशन वाढीची गोड बातमी मिळू शकते. या 4 राशींच्या आयुष्यामध्ये चांगल्या दिवसांचं आगमन होणार आहे.

1) मेष :
मेष राशींच्या व्यक्तींचं आज आरोग्य उत्तम आणि शरीर सुदृढ असण्याचा भाव असणार आहे. त्याचबरोबर नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. बॉसकडून प्रमोशनची गोड बातमी मिळण्याची देखील शक्यता दिसत आहे. बाकी मेष राशींसाठी आजचा दिवस फलदायी ठरणार आहे.

2) वृषभ :
वृषभ राशींच्या व्यक्तींचं आरोग्य थोडं नरम असेल. कौटुंबिक व्यवस्थापनाची चिंता स्वतःवत राहील. वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सर्वांबरोबर चांगल्या वाणीमध्ये सुसंवाद साधला पाहिजे. नाहीतर उगाचच वाद आणि वैर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम बाळगा.

3) मिथुन :
मिथुन राशीचे व्यक्ती आज कुटुंबीयांबरोबर आनंदाचा दिवस साजरी करतील. सोबतच नोकरी किंवा व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मिथुन राशीच्या व्यक्तींच्या राशीमध्ये आज विवाह योग देखील लिहिला आहे.

4) कर्क :
कर्क राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अतिशय उत्साहात आणि आनंदात जाईल. पगारवाढीची गोड बातमी वरिष्ठांकडून मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन वाढीची शक्यता आहे.

5) सिंह :

सिंह राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चिंतेत जाऊ शकतो. जुने वाद पुन्हा उखाळून निघू शकतात. त्याचबरोबर तब्येत थोडी नरम राहू शकते. सर्दी आणि खोकल्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे.

6) कन्या :
कन्या राशींच्या व्यक्तींनी आज मनावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्याकडून एखाद्या जवळच्या व्यक्तीचं मन दुखावले जाऊ शकतं. रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यास उत्सुकता असेल.

7) तूळ :
तूळ राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस मनोरंजनाने भरलेला असणार आहे. कुटुंबीयांसह एखाद्या फॅमिली ट्रिपवर जाण्याचा प्लॅन बनू शकतो. त्याचबरोबर घरातील काही वस्तूंची खरेदी करण्याचा देखील आज चांगला योग दिसून येत आहे.

8) वृश्चिक :
वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आज मित्र-मैत्रिणींचं चांगलं सहकार्य लाभेल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस अत्यंत फलदायी असून धनलाभाचा योग देखील आहे.

9) धनु :
धनु राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक कोणीतरी नवीन व्यक्ती इंटर करू शकते. त्याचबरोबर जुन्या वादांना फाटे फुटू शकतात त्यामुळे वाणीवर संयम बाळगा.

10) मकर :
मकर राशींचा आजचा दिवस अतिशय उत्स्फूर्तपणे आणि जल्लोषात जाणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींना अचानक एखाद्या चांगल्या जॉबची ऑफर येऊ शकते. त्याचबरोबर धनलाभाचा देखील योग दर्शवला आहे.

11) कुंभ :
कुंभ राशींच्या व्यक्तींना आज प्रवास करावा लागू शकतो. दिवस थोडा धावपळीचा असेल परंतु मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने दिवसभर आनंदी आणि मनोरंजित रहाल.

12) मिन :
मीन राशी असलेल्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हा धनलाभ ज्येष्ठांमार्फत होऊ शकतो. नकारात्मक विचारांपासून लांब राहा. आज शत्रूचं बळ बळवलेलं असेल त्यामुळे सावध राहा.

Latest Marathi News | Horoscope Today 18 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(932)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या