3 May 2025 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल असा सर्व्हे, निवडणुकीत भाजप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देणार नाही

chhattisgarh Assembly Election 2024

chhattisgarh Assembly Election 2024 | कर्नाटकातील पराभवानंतर भारतीय जनता पक्ष रणनीती बदलताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न जाहीर करताच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. तसेच तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या रमण सिंह यांना प्रचारावेळी मागच्या सीटवर सीटवर बसवलं जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कॉंग्रेसचे सरकार असून पक्षाने त्यांची स्थिती अत्यंत भक्कम आहे आणि दुसरीकडे छत्तीसगड भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी आहे आणि त्याची भाजपाला अधिक चिंता सतावत आहे.

त्यामुळे भाजप इतिहासात पहिल्यांदाच छत्तीसगड राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देताच निवडणूक लढविणार असल्याचे भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तात म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने सर्वसमावेशक नेतृत्वासह विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी रायपूरला जाणार असताना भाजपकडून हा धोरणात्मक बदल केला जात आहे.

भाजप आपली रणनीती का बदलत आहे?

या माध्यमातून भाजपला राज्यातील गटबाजीला आळा घालायचा असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडमधील नेत्यांसोबत बैठक घेतली. पक्षाने राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता

विशेष म्हणजे 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. राज्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे. 2018 मध्ये दोन्ही पक्षांमधील मतांची तफावत ही 10 टक्क्यांहून अधिक झाली होती. भाजपला राज्यातील ९० पैकी केवळ १५ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने ६८ जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. राज्यात विधानसभा निवडणूक ३-४ महिन्यांवर आल्या आहेत आणि सर्व्हेनुसार काँग्रेस छत्तीसगडमध्ये पुन्हा बहुमताने सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने भाजपाची चिंता प्रचंड वाढली आहे.

लोकसभेत भाजपचे पुनरागमन

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात शहीद CRPF जवानांच्या नावाने मतं मागितली होती आणि त्या जोरावर भाजपने छत्तीसगडमध्ये 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवली होती. तेव्हा पक्षाला छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या ११ पैकी ९ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि मतदार देखील भाजपच्या निवडणुकीच्या दरम्यानच्या धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांच्या ओळखू लागली आहे. तसेच राज्यात आता काँग्रेस सत्तेत असून ते अत्यंत भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाची अडचण प्रचंड वाढली आहे.

News Title : chhattisgarh Assembly Election 2024 BJP will not declared CM Candidate 13 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#chhattisgarh Assembly Election 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या