3 May 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

ठाकरे सरकार पाडण्यासाठी गुजरातमार्गे पळ काढला | आता गुजरातच्या फायद्याच्या बुलेट ट्रेनला शिंदे सरकारची मंजुरी

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | महाराष्ट्रातल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यात पेट्रोल तसंच डिझेलच्या दरांवरचा व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर ५ रूपये तर डिझेल प्रति लिटर ३ रूपये स्वस्त झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. या कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्व मंजुऱ्या देण्यात आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा आज केली. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बराच काळ रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पालाही शिंदे सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनसंबंधी मुख्यमंत्र्यांनी सर्व परवानग्या दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा वेग धरणार आहे. वास्तविक या प्रकल्पात महाराष्ट्राचं हित नसून केवळ गुजरात लॉबीच्या तालावर शिंदे सरकार ऑपरेट होणार याचे संकेत राजकीय विश्लेषकांनी आधीच दिले होते.

ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून पुनरावलोकन करण्यात आलं. मागील 6 महिन्यांतील निर्णयाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ठाकरे सरकारनं रद्द केलेले तब्बल 4 निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा घेतले आहेत.

महाराष्ट्राला काहीच फायदा नाही :
हा प्रकल्प वादात सापडण्यामागील आणखी एक कारण म्हणजे या प्रकल्पात महाराष्ट्राची भरपूर जमीन अधिग्रहण होत असताना राज्यातील फक्त चार रेल्वे स्थानकांना बुलेट ट्रेनचा थांबा देण्यात येणार आहे. तर गुजरातमधील आठ रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात येणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जूनमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या सुरतमध्ये अचानक भेटी वाढल्या होत्या :
महाराष्ट्रात सरकार बदलल्याने गुजरातच्या सुरतमध्ये हे काम रेंगाळले होते. कारण या प्रकल्पाचा महाराष्ट्रातील जनतेला कोणताच फायदा नाही. केवळ गुजरात सरकारच्या हट्टापायी हा प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारला जाणार आहे हे देखील सत्य आहे. विशेष म्हणजे १-२ महिन्यात महाराष्ट्रातील सरकार पडणार असल्याची गुजरातमध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी माहिती होतं. परिणामी सुरतमध्ये रेंगाळलेल्या बुलेट ट्रेनच्या कामांना केंद्रीय मंत्र्यांच्या अचानक भेटीगाठी सुरु झाल्यास होत्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ६ जून रोजी सुरतमधील अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी केली होती. सुरत-बिलीमोरा मार्ग 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी आम्ही वेळापत्रकात आहोत, असे ते म्हणाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde approval to Mumbai Ahmadabad bullet Train check details 14 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या