20 August 2022 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | असा जबरदस्त स्टॉक निवडा, 92 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 4.5 कोटी केले, स्टॉकबद्दल जाणून घ्या Credit Card Benefits | प्रत्येक वेळी खरेदी करताना तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड का वापरावे, जाणून घ्या 10 मोठे फायदे EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम Viral Video | होमवर्क पासून सुटकेचा जबरदस्त उपाय, चिमुकल्याने सुरु केली टिचरची स्तुती, मजेदार व्हिडिओ व्हायरल NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

शिंदेंकडून प्रॉपर्टीवर स्वतःच्या वडिलांच्या नावाचा वापर | पण पक्षासाठी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाचा वापर होणार?

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेत फूट पडल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोर आमदारांच्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. दीपक केसरकर यांनी ही माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

शिंदे गटाचं नाव निश्चित :
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने नवं नाव निश्चित केलं आहे. २२ जूनपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत असून, तेथे पुढील निर्णय घेतले जात आहे. मागील काही दिवसांपासून फक्त आमदारांकडून भूमिका स्पष्ट केल्या जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचं नाव निश्चित झालं आहे. शिवसेना बाळासाहेब असं नव्या गटाचं नाव असणार आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले :
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना म्हटलं होतं की त्यांनी ठाकरे आणि शिवसेना हे नाव न घेता जगून दाखवावं. अशात आता आज शिंदे गटाचं नवं नाव समोर आलं असून यात ठाकरे आणि शिवसेना दोन्ही नावं घेतली गेली आहेत. अशात आता शिवसेना याला विरोध करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी आणि नेत्यांनी शिंदे गटाला बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे नाव स्वार्थासाठी घेतलेलं असून हे सगळं बंडखोरांना बाळासाहेबांना मिळवून दिलं तरीही अशाप्रकारे गद्दारी करणाऱ्यांना हा अधिकारी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde party name will be Shivsena Balasaheb Thackeray check details 25 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x