13 December 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

आमदारांचे अपहरण केल्याचे अमान्य | पण भौगोलिक अंतर वाढवत गेले | येथेच शिंदेंचा आमदारांवरील अविश्वास सिद्ध होतोय

Eknath Shinde

Eknath Shinde| एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाचे ३३ आमदार फोडून आधी सुरत आणि आता गुवाहाटी गाठले आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. पालघर सीमेवर एकनाथ शिंदेंच्या हालचालींवरून संशय आल्याने एकाने तेथून पळ काढला आणि तो आमदार मिळेल त्या गाडीने मुंबईला पोहोचला. तिथेच आमदारांना अंधारात ठेवून गुजरातच्या सीमेवर घेऊन जायचं आणि तेथे भाजपने सज्ज ठेवलेल्या गुजरात पोलिसांच्या संरक्षणात या आमदारांना दबावात ठेवायचं अशी योजना होती. सध्या असलेले आमदार भौगोलिक दृष्ट्या खूप लांब असल्याने त्यांच्याकडे एकनाथ शिंदेंना होला हो उत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचं दिसतंय.

एकाच विषयाला धरून प्रतिक्रिया :
हिंदुत्व आमच्यासाठी महत्वाचं आहे.माझ्यासोबत असलेले आमदार हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहेत.सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंदुत्वाशी तडजोड कधीच करणार नाही,असं ते म्हणाले. शिंदे यांनी सांगितलं की, आमच्यासोबत 46 आमदार आहेत. या शिवसेनेसह इतरही आमदार आहेत.हा आकडा अजून वाढणार आहे.आमच्या कुठल्याही अटी नाहीत.

अपहरण केल्याचे आरोप फेटाळून लावले :
एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे अपहरण केल्याचे आरोप फेटाळून लावले. आमदारांचे अपहरण केले असते तर त्यांना सुखरुपपणे राज्यात पाठवले नसते, असेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे मान्य केले. त्याशिवाय रश्मी ठाकरे यांच्यासोबत ही चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, त्यांनी चर्चेचा तपशील सांगण्यास नकार दिला. उद्धव ठाकरे यांना तुम्ही तुमचा नेता मानता का, असा थेट प्रश्न केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणे टाळत फोन ठेवून दिला.

भौगोलिक दृष्ट्या अधिक लांब :
विशेष म्हणजे अपहरण केल्याचे आरोप फेटाळणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आमदारांना मुंबई आणि महाराष्ट्रापासून भौगोलिक दृष्ट्या अधिक लांब घेऊन जाण्यासाठी भाजपाची मदत इतक्या वेगाने का घेतली असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावरून त्यांचा बंडखोर आमदारांवर विश्वास नसल्याचं सिद्ध होतंय. काही निसटलेल्या आमदारांच्या कबुलीवरून त्याला दुजोरा देखील मिळतोय.

आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही :
एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी बोलताना म्हटलं होतं की, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो हिंदुत्वाचे बाळासाहेबांचा आहे ते कडवट हिंदुत्व ही भूमिका ही भूमिका आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातोय. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही,आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढचे राजकारण समाजकारण करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde political stand is not clear says political experts check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x