10 December 2024 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

एकनाथ शिंदेंचं शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी पहिलं पाऊल | विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी स्वतःचा समर्थक नेमला

Eknath Shinde

Eknath Shinde | बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगितलं आहे.

शिवसेनेच्या वतीने पक्षप्रतोद पण :
शिवसेनेच्या वतीने पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी हे पत्र काढलं आहे. आता हा आदेश अवैध असून विधिमंडळाच्या मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे सुनिल प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश हे कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

शिवसेनेला आणखी एक धक्का :
त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

आमदारांवर कारवाईचा बडगा :
शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना नोटीस पाठवली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde took first step to take over Shivsena party check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x