10 December 2024 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

एकनाथ शिंदेंच्या गटातील अब्दुल सत्तारांचा हिंदुत्वासाठी हट्ट? | शिंदेंच्या जनतेला टोप्या? | कुहेतूसाठी हिंदुत्वाचा आधार

Eknath Shinde

Eknath Shinde | राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहेत. काही आमदारांसह शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह सध्या गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची विसर पडली, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आणि इतर अपक्ष आमदार सोबत आहोत अशी माहिती दिली. अजूनही आमदार गुवाहाटीमध्ये येत आहे. संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आमचा हट्ट हिंदुत्वसाठी आहे आणि आमची नाराजी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर आहे. नेतृत्वावर नाराजी अजिबात नाही अशी माहिती दिली आहे.

अब्दुल सत्तार यांचा सुद्धा हिंदुत्वसाठी हट्ट?
विशेष म्हणजे बंडखोर आमदारांच्या गटात अनेक विवादित आमदार देखील आहेत. त्यात सिल्लोड औरंगाबादचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांचा देखील समावेश आहे. अब्दुल सत्तार हे मूळचे काँग्रेस पक्षातील नेता आयत्यावेळी शिवसेनेत आले आणि राज्यमंत्री झाले होते. त्यावर त्यांना कॅबिनेट मंत्री पद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी बंडखोरीचे कारण सांगताना सर्व आमदारांचा हिंदुत्वासाठी हट्ट असल्याचं म्हटलं होतं आणि अब्दुल सत्तार हे हिंदुत्वाच्या हट्टासाठी शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत हे म्हणजे हास्यास्पद म्हणावं लागेल.

शिवसेनेला आणखी एक धक्का :
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde stand of Hindutva may be bogus says experts check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x