27 April 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
x

संयुक्त राष्ट्रांत भारत खरंच भक्कम? महत्वाच्या निवडणुकीत दुबळ्या पाकिस्तानकडून भारताचा दारुण पराभव

Pakistan defeated India in UNESCO

United Nations Election | संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकदा जोरदार वाद विवाद होत असतात. एकीकडे काश्मीरच्या मुद्द्यावर जगातील काही देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलत असतो, तर दुसरीकडे दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत आहे. संयुक्त राष्ट्रसंघात मुत्सद्देगिरीच्या जोरावर भारत पूर्वीपासूनच पाकिस्तानला पराभूत करत आहे.

मात्र, पाकिस्तानने मोदी सरकारला थेट संयुक्त राष्ट्राच्या एका महत्वाच्या निवडणुकीत धूळ चारली आहे. त्यामुळे भारत संयुक्त राष्ट्रात खरंच भक्कम आहे का यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. कारण शुक्रवारी झालेल्या महत्वाच्या निवडणुकीत पाकिस्तानने बाजी मारली. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानने भारताविरुद्ध मोठा विजय मिळवला आहे.

मोदी सरकारच्या प्रतिनिधीनींसमोर शारदा पीठ मंदिर पडणाऱ्यांचा विजय
युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, कला, संस्कृती आणि वारसा संस्था आहे. ही संस्था जागतिक शांततेसाठीही काम करते. युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेले शारदा पीठ मंदिर पाडणाऱ्या पाकिस्तानला जागतिक संघटनेचे उपाध्यक्ष करण्यात आले तर ते विडंबनच म्हणावे लागेल.

शुक्रवारी झालेल्या मतदानात पाकिस्तानला ३८ तर भारताला केवळ १८ मते मिळाली. आता पाकिस्तान दोन वर्षांसाठी युनेस्कोचा उपाध्यक्ष असेल. युनेस्कीच्या कार्यकारी मंडळात ५८ सदस्य आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे त्याची बैठक पार पडली. या विजयामुळे पाकिस्तान खूप उत्साहित आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सर्व देशांचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. मात्र, पाकिस्तानच्या विजयाचा भारतावर परिणाम होणार नाही. सदस्यांच्या मताशिवाय पाकिस्तान या यादीतील कोणताही वारसा वाढवू किंवा कमी करू शकत नाही.

या विजयानंतर पाकिस्तानने आपली जबाबदारी पूर्ण तत्परतेने पार पाडणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानात अनेकदा हिंदू मंदिरे आणि प्राचीन ठिकाणे, इमारतींवर हल्ले केले जातात. त्याला पाकिस्तान सरकारचाही पाठिंबा आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंगलाज माता मंदिर न्यायालयाच्या आदेशानंतर पाडण्यात आले. अशा तऱ्हेने युनेस्कोमध्ये समाविष्ट असलेले मंदिर पाडण्यास पाकिस्तान मागेपुढे पाहत नाही. नियंत्रण रेषेजवळील शारदा पीठाचे मंदिरही पाडण्यात आल्याचे वृत्त आहे. युनेस्कोच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता.

न्यायालयाच्या आदेशानंतर मिठी शहरातील हिंगलाज मंदिर पाडण्यात आले. त्याचबरोबर शारदा पीठ वाचवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. परंतु मंदिराजवळ कॉफी हाऊस बांधण्यात आले असून, त्याचेउद्घाटनही होणार असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या मंदिरांव्यतिरिक्त त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. अपहरण, टार्गेट किलिंग, जमिनीवर अतिक्रमण हे प्रकार सामान्य झाले आहेत.

News Title : Pakistan defeated India in United Nations Election UNESCO 26 November 2023.

हॅशटॅग्स

#Pakistan defeated India in UNESCO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x