4 December 2024 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
x

आधी कट-टू-कट आमदारांच्या संख्येवर सत्तेत | नंतर लगेच सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावायचे

Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्रात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. त्यामुळे राजकीय भूकंप आला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आम्हाला पुढे घेऊन जायची आहे. मुंबई तकशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ४६ आमदारांचं बळ असल्याचा दावा केला आहे.

शिंदे काय म्हणाले :
शिवसेनेचे आमच्याकडे ३७ आमदार आहेत, तर ९ अपक्ष आमदार आहेत असं एकूण ४६ आमदार आमच्यासोबत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पक्षांतर बंदीची कारवाई होऊ नये म्हणून जी आमदारांची संख्या लागते ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ४६ मधले ९ अपक्ष आमदार आहेत.

भाजपाची पुढची तयारी :
भाजप आता पुढच्या घडामोडींसाठी थेट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. भाजपकडून तसे प्रयत्नच सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरतमध्ये दाखल झाले आहेत. तसेच ते तिथून गुवाहाटीच्या देशाला देखील रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप थेट सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही :
शिवसेनेतून फुटलेल्या गटाला घेऊन भाजप थेट सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही किंवा तसे करता येत नाही. यासाठी आधी विरोध पक्ष हे सरकार अल्पमतात असल्याचे पत्र राज्यपालांना देईल. त्यानंतर राज्यपाल विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देतील. त्यानंतर फ्लोवर टेस्टमध्ये विद्यमान सरकारचे भविष्य ठरेल. जर सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर विरोधकांना राज्यपालांकडे बहुत असल्याचा दावा करावा लागेल. त्यानंतर बहुमताचा दावा करणाऱ्या गटाला बहुमत सिद्ध करायला राज्यपाल आमंत्रित करतील. बहुमत सिद्ध केल्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde stand against Shivsena onver negative stand check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x