13 December 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

MahaVikas Aghadi | कायदेशीर प्रक्रियेवर जोरदार हालचाली | घटनात्मक बाजू काय सांगते?

MahaVikas Aghadi

MahaVikas Aghadi | राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना नेमकं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे प्रभारी राज्यपाल नवीन मुख्यमंत्र्यांना पाचारण करतील. बहुमत सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं. प्रभारी राज्यपालांच्या देखरेखेखाली या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते :
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्यासंबधी अनेक घडामोडी होऊ शकतात. अधिवेशनात सरकार बनवण्याच्या तांत्रिक घडामोडी तपासून पाहिल्या जातील, बहुमत सिद्ध होत असेल तर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

2/3 मेजॉरिटीचे पत्र :
जर एकनाथ शिंदे यांचं हे बंड यशस्वी झालं तर सत्ताबदलाची वाट नेमकी कशी असेल याची उत्सुकता आहे. आज एकनाथ शिंदे येतील पत्र घेवून येतील. विधानसभा अध्यक्षांना ते भेटतील. अध्यक्ष नसल्याने उपाध्यक्ष यांच्याकडे ते गट स्थापन केल्याचे पत्र देतील. 2/3 मेजॉरिटी असेल तर विधानसभा अध्यक्ष त्या गटाला परवानगी देतील.

सरकारचा पाठिंबा काढला असं पत्र देतील :
त्यानंतर ते राज्यपाल कार्यालयात भेटतील आणि सरकारचा पाठिंबा काढला असं पत्र देतील. यानंतर राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगतील. बहुमत नाही असं लक्षात आलं तर मुख्यमंत्री राजीनामा देतील अन्यथा ते बहुमताला सामोरे जातील. अशी साधारण प्रक्रिया होऊ शकते असा अंदाज आहे.

एकनाथ शिंदेंकडे काय आकडा :
आकड्यांबाबत बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, शिवसेनेचे 33 आमदार आणि 3 अपक्ष असे एकूण 36 आमदार एकत्र आहेत. तर हाच आकडा सांगताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी वेगळा सांगितला आहे. शिरसाट यांनी सांगितलं की, आम्ही सर्वजण सोबत आहोत. शिवसेनेचे 35 आमदार आणि 5 अपक्ष असे एकूण 40 आमदार सोबत आहेत. दुपारपर्यंत 46 च्या पुढे जाईल. त्यात शिवसेनेचे 40 आमदार असतील, असाही दावा त्यांनी केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MahaVikas Aghadi govt may be collapsed check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)#MahaVikas Aghadi(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x