5 May 2024 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

MahaVikas Aghadi | विधानसभा बरखास्तीसाठी धावपळ | पण राज्यपाल काय निर्णय घेणार यावरच सर्व अवलंबून

MahaVikas Aghadi

MahaVikas Aghadi | शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. तब्बल ४६ आमदार शिंदेंनी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळाची बैठक बोलावली :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा बरखास्तीची दोन कारणं :
विधानसभा बरखास्तीची दोन कारणं आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, किंवा सत्ताधारी पक्षावर अविश्वासाचा ठराव आणवा आणि सत्ताधारी तो अविश्वासाचा ठराव जिंकू शकले नाही, तर विधानसभा बरखास्त होऊ शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेलं ट्वीट अत्यंत बोलकं आहे. त्यांच्या ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या ट्वीटमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी शिवसेनेचे आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे, या बैठकीत भविष्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत चर्चा केली जाणार आहे.

भाजपला पोषक भूमिका घेऊ शकतात :
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार कोसळणार का? भाजप काय भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात का? महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात काय घडू शकतं? राजकीय जाणकारांच्या मते, नाराज एकनाथ शिंदे आनंदसेना किंवा धर्मवीर संघटना स्थापन करुन भाजपला पोषक भूमिका घेऊ शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MahaVikas Aghadi government may be dissolve check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#MahaVikas Aghadi(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x