1 May 2025 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राणा दाम्पत्याचा निव्वळ राजकीय स्टंट | सामान्य लोकांना मूर्ख असल्याचे गृहीत धरूनच मुंबईत राजकीय ड्रामा

MLA Ravi Rana

नवनीत राणा आणि रवि राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नऊ वाजताच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केलेले शिवसैनिक बॅरिकेट्स तोडून इमारतीत घुसले आहेत. शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम असून, मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान पुर्ण करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे शिवसैनिका राणा दाम्पत्यांविरोधात आक्रमक झालेले आहेत. शुक्रवारी सकाळपासून पोलिसांबरोबरच शिवसैनिकही मातोश्री बाहेर पहारा देत आहेत.

नवनीत राणा आणि रवि राणा मातोश्री येथे जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत असून, सध्या शिवसैनिकांनी मातोश्री बरोबरच राणा यांच्या खार येथील बंगल्या बाहेरही गर्दी केली. गर्दी वाढत असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

स्वतःच्या वैयक्तिक राजकारणासाठी नको ते राजकीय स्टंट :
खासदार नवनीत राणा यांच्यासंबधित खोटा जातीचा दाखला आणि त्यासंबधित न्यायालयात असलेला खटला याचा थेट शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी संबंधित आहे. तसेच आमदार रवी राणा यांच्यावर पालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर काही दिवस ते पोलीस आणि माध्यमांना नॉट रिचेबल झाले होते. त्याच प्रकरणात शिवसेनेवर राजकीय दबाव आणि शिवसेनेची बदनामी करण्यासाठी एक शिस्तबद्ध प्लॅन रचला गेल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे माध्यमांना आमदार रवी राणा देत असलेल्या प्रतिक्रियांवरून हे सर्व भाजपच्या स्क्रिप्टवर सुरु असल्याचा आरोप आता सुरु झाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MLA Ravi Rana and MP Navneet Rana political stunt in Mumbai Matoshri check details 23 April 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MLA Ravi Rana(1)#MP Navneet Rana(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या