16 December 2024 3:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

शिंदे फसले? | शिंदेंसहित बंडखोर आमदारांची राजकीय विकेट जाणार? | कायदेतज्ज्ञ ठामपणे सांगत आहेत

Ekanth Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचे बंड प्रकरण आता धक्कादायक वळणावर पोहचले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे. गुवाहाटीत झालेल्या बंडखोऱांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसह गेलेल्या ५० आमदारांनी ही एकमुखाने ही मागणी केल्याचे समजते. मात्र, आता बंडोखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. यामुळे या संपूर्ण गटाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.

सुप्रीम कोर्टाचे अनुभवी वकील देवदत्त कामत यांची शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद :
काही दिवस शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहाटीत थांबलेले आहेत आणि तिथं थांबून वेगवेगळ्या क्लिप मीडियाकडे देत राहतात, अशी टीका करत अरविंद सांवत म्हणाले की, महाराष्ट्रातील लढाई केवळ राजकीय नसून कायदेशीर आहे.

शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांचे मुद्दे :
१. मी कायदेशीर अंगानं बोलणार आहे, राजकीय बोलणार नाही
२. शिवसेनेने आमदारांना बैठकांसाठी बोलवलं, पण ते आले नाहीत, महाराष्ट्राबाहेर जाणे, भाजपच्या नेत्यांना भेटणे हे पक्षाविरोधात वर्तन आहे.
३. बंडखोरांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला
४. दोन तृतीयांशचा नियम केवळ एखाद्या पक्षात विलीन झाल्यावर लागू होतो. त्यामुळे त्यांना प्रथम भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल.
५. आतापर्यंत ते कोणत्याही पक्षात विलीन झाले नाहीत, त्यामुळे ते आमदारकीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकतात.
६. नोंद नसलेल्या ईमेलवरून कुणीतरी विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव पाठवला गेला
७. उपाध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात येत नाही असं ते (बंडखोर आमदार) म्हणतात, पण त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत.
८. उद्यापर्यंत (27 जून) त्यांना उत्तर द्यावं लागेल, आम्हाला खात्री वाटते की, त्यांनी नियमबाह्य वर्तन केलं आहे. त्यामुळे ते अपात्र ठरतात.
९. आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात राज्यपाल काहीच करू शकत नाहीत, असं सुप्रिम कोर्टानं आधीच स्पष्ट केलंय.

आदित्य ठाकरेंनी दाखवला आत्मविश्वास :
आज राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही,” असं आव्हान युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना दिलंय. धनुष्यबाण आपल्याकडेच (शिवसेनेकडे) राहणार आहे. शिंदे गटाला प्रहार किंवा भाजपमध्ये विलीन होण्याचाच पर्याय आहे. त्यांचं स्वत:चं अस्तित्त्व संपणार आहे,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ekanth Shinde legally in danger zone as experts says check details 26 June 2022.

हॅशटॅग्स

#Ekanth Shinde(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x