28 September 2022 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कुठलाही निर्णय न घेण्याचे आदेश Stocks To Buy | बँक किती वार्षिक व्याज देईल?, पण हा शेअर 44 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, नाव नोट करा LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर Mutual Fund Investment | म्युच्युअल फंड SIP मार्फत 1 कोटीचा निधी कसा तयार करता येईल | वाचा सविस्तर Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या
x

अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार?

Mumbai BJP President MLA Ashish

BJP MLA Ashish Shelar | मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. या निवडणुकीच्या वेळी मुंबई महापालिकेत बदल निश्चित होणार अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई महापालिका ही आमची जहागीर आहे असं समजत मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराची बजबजपुरी करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून आम्ही काढून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खड्ड्यांची समस्या, त्याच त्याच कंत्राटदारांना पोसणं, कोस्टल रोडचं निकृष्ट काम असे असंख्य विषय आहेत असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

सांडपाणी निविदेत दिरंगाई आणि घोळ यातून शिवसेनेचे हात झटकू शकत नाही. आमचं ठरलं आहे भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करायचं आहे. मुंबईकरांच्या मनात असलेलं विकासाचं चित्र रंगवून मुंबईकरांना सुपूर्द करायचं आहे असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

भ्रष्‍टाचारी व्‍यवस्‍थेला तडीपार करण्‍यासाठी :
मुंबईकरांसाठी आम्‍ही गेली दोन दशकभर ज्‍यांच्‍याबरोबर संघर्ष केला, त्‍या भ्रष्‍टाचारी व्‍यवस्‍थेला तडीपार करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करेन. तसेच केंद्रीय नेतृत्वाला मुंबईत जे काम अपेक्षित आहे ते करत यश संपादन करुन देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही करू. त्‍यासाठी मुंबईतील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिका-यांची मोठी टीम असून सगळे मिळून आम्‍ही आमचाच महापौर महाापालिकेत बसवू असेही आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले.

मुंबईकरांना या पासून सुटका हवी :
मुंबईतील रखडलेला कोस्‍टल रोड, मेट्रोच्‍या आरेतील कारशेडला अडवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, संगणक खरेदीमध्‍ये भ्रष्‍टाचार, शालेय साहित्‍य देण्यात झालेला विलंब अशी अत्‍यंत भ्रष्‍ट व्‍यवस्‍था मुंबई महापालिकेत असून मुंबईकरांना या पासून सुटका हवी आहे. ज्‍यांनी आतापर्यंत ठराविक कंत्राटदरांना पोसले व कंत्राटदारांनी ज्यांना पोसले त्यांना महापालिकेतून तडीपार करण्याची गरज आहे. मुंबईकरांची ही इच्छा पुर्ण होईल, असेही त्यांनी जाहीर केले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai BJP President MLA Ashish Shelar press conference before BMC Election 2022 12 August.

हॅशटॅग्स

#Mumbai BJP President MLA Ashish(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x