6 October 2022 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 07 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Tips To Reduce Dark Circles | महागड्या क्रिम्सने सुद्धा डोळ्याखालील डार्क सर्कल दुर होतं नाहीत?, नैसर्गिकरित्या घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा SBI ATM Rule | तुम्ही एसबीआय एटीएम वापरता?, रोख रक्कम काढली तर तुम्हाला 173 रुपये द्यावे लागतील असा मेसेज आला? Surya Grahan 2022 | या तारखेला होणार सूर्यग्रहण, ज्योतिषशास्त्रानुसार या 5 राशींच्या लोकांच्या नशिबाची दारं उघडतील SIP Calculator | म्युचुअल फंड SIP मध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवा, 2 कोटीचा बंपर परतावा कसा मिळेल ते गणित समजून घ्या Hairstyles For Girls | पार्लरमध्ये न जाता घरीच करा केसांची स्टायलिश रचना, त्यासाठी या घरगुती टिप्स फॉलो करा PPF Scheme | या सरकारी योजनेतून देखील 1 कोटींचा हमी परतावा मिळेल, टॅक्स सवलत आणि बरंच काही मिळेल, योजनांबद्दल जाणून घ्या
x

DCM Ajit Pawar | आता ही स्क्रिप्ट कोणी लिहिली? | संतांच्या देहूत सुद्धा 'राजकीय द्वेषाचं' राजकारण राज्यानं पाहिलं

PM Narendra Modi

DCM Ajit Pawar | आज देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याच्या मुद्द्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही. यावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान कार्यालयानेच अजित पवारांच्या भाषणाला परवानगी दिली नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

अजित पवार हे पालकमंत्री :
अजित पवार हे पालकमंत्री आहेत आणि पंतप्रधानांचाच प्रोटोकॉल त्यांना लागू असतो. त्यामुळे त्यांना हजर राहणे आवश्यक असतं. केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात पंतप्रधान येणार असतील, तर पालकमंत्र्यांना जावं लागतं. उपमुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे विनंती भाषण करू देण्याची विनंती केली होती. अजित पवार तिथं जाणं योग्यचं आहे. पण, तिथं बोलायला दिलं नसेल, तर मला ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉलप्रमाणे ते पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवारांचं भाषण असायला हवं होतं,” असं ते म्हणाले.

पंतप्रधानांनी हाताने इशारा केला, पण…
देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमावर भाजपची छाप असल्याचं दिसून येत होतं. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे स्टेजवर उपस्थित होते.

फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर :
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Narendra Modi visit to Dehu Pune check details 14 June 2022.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(185)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x