2 May 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

केंद्रात अत्यंत ‘दुष्ट’ सरकार बसलंय, ही लोकं सत्तेतून गेल्यावरच देशाचं आणि राज्याचं भलं होईल | मुख्यमंत्री केसीआर गरजले

Telangana CM KCR

Telangana CM KCR | तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) हे सतत भाजप आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवत असतात. या प्रकरणी त्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केसीआर यांनी आपल्या सभेत केंद्र सरकार फक्त फोडाफोडीचं राजकारण खेळत असल्याचा आणि देशभरातील बिगर-भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर केंद्रातील सत्ताधाऱ्यांना त्यांनी ‘दुष्ट’ म्हटले आणि या लोकांच्या जाण्यानंतरच देशाला व राज्याचं भलं होईल, असे सांगितले.

कृष्णा नदी – तेलंगणाच्या हिश्श्याबाबत निर्णय नाही :
येथील रंगारेड्डी जिल्ह्याच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर राव एका जाहीर सभेत बोलत होते. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्यात तेलंगणाच्या हिश्श्याबाबत मोदी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. केंद्रातील निरुपयोगी सरकार हटविल्यानंतरच आपले भले होईल, असा घणाघात त्यांनी भाषणांत केला. आगामी काळात राष्ट्रीय राजकारणातही आपल्या तेलंगणाने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. तेलंगणाने (भूमिका) निभावावी का? आपण राष्ट्रीय राजकारणात हात आजमावायचा का? आपण पुढे जायला हवं का? अशी आवाहान त्यांनी उपस्थितांना केली.

तरच तेलंगणा सुवर्णमय होईल :
या दुष्ट लोकांचा निरोप घेतल्यानंतरच देशाचे भेले होईल आणि सुवर्ण तेलंगणाची निर्मिती होईल, असे राव म्हणाले. तेलंगणने राष्ट्रीय राजकारणातही चैतन्यदायी भूमिका बजावली पाहिजे आणि महायज्ञातही भागीदार व्हावे, ज्यांनी लोकांमध्ये फूट पाडून समाजात अधीरता निर्माण केली आणि विरोधी पक्षांची सरकारे दुष्टपणे पाडली, अशा धार्मिक वेडेपणाने बोकाळलेल्या लोकांना या देशात स्थान नाही, हे सिद्ध होईल, असे ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Telangana CM KCR attack on Modi Government in rally check details 26 August 2022.

हॅशटॅग्स

#Telangana CM KCR(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x