2 May 2025 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Rajasthan Congress | राजस्थान काँग्रेसच्या गहलोत सरकारच्या कामगिरीवर जनता खुश, सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारीने भाजपचं टेंशन वाढणार

Highlights:

  • Rajasthan Congress
  • सी-व्होटर सर्वेक्षण
  • गेहलोत आणि काँग्रेससाठी आनंदाची बातमी
  • राजस्थान भाजपमध्ये मोठी गटबाजी
  • सचिन पायलट नवा पक्ष स्थापन करणार का?
  • भाजपमध्ये प्रवेश करणार का?
Rajasthan Congress

Rajasthan Congress | राजस्थान विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच पक्ष आपापल्या तयारीत गुंतले आहेत. अशातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

सी-व्होटर सर्वेक्षण

सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ३९.१ टक्के लोकांना मुख्यमंत्री गेहलोत यांच्या सरकारचे काम उत्कृष्ट असल्याचे वाटते. तर या याच सर्वेक्षणात २९.६ टक्के लोकांनी गेहलोत सरकारचे काम समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे, तर २७ टक्क्यांहून अधिक लोकांना गेहलोत सरकार निराशाजनक असल्याचे वाटते. या सर्वेक्षणानंतर राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाची चिंता वाढू शकते. कारण जवळपास ७० टक्के जनता गेहलोत सरकारच्या कामावर सरकारात्मक असल्याचं आकडेवारी सांगते आहे.

रविवारी जाहीर झालेल्या सी-व्होटर सर्वेक्षणानुसार, राजस्थानमधील सुमारे 40 टक्के जनता राज्यातील गेहलोत सरकारवर खूश आहे, तर सुमारे 30 टक्के लोक कामावर समाधानी आहेत. गेहलोत सरकारचे काम निराशाजनक म्हणणाऱ्यांची संख्या २७ टक्क्यांच्या आसपास आहे.

गेहलोत आणि काँग्रेससाठी आनंदाची बातमी

निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल गेहलोत आणि काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेहलोत सरकारवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या निकालावर काँग्रेस खूश होऊ शकते.

राजस्थान भाजपमध्ये मोठी गटबाजी

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. मात्र, नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचे मानले जात होते, मात्र पायलट यांनी आपण मांडलेल्या मागण्यांवर अजूनही ठाम असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. मात्र यावर भाजपाला खुश होण्याची परिस्थिती नाही, कारण दुसऱ्या बाजूला खरी मोठी गटबाजी राजस्थान भाजपमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय.

सचिन पायलट नवा पक्ष स्थापन करणार का?

सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात सचिन पायलट यांच्या भविष्यातील पर्यायांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात भाजप-काँग्रेस समर्थकांचाही समावेश करण्यात आला आहे. २२ टक्के भाजप समर्थकांना सचिन पायलट आपला नवा पक्ष स्थापन करतील, असे वाटते. तर या सर्वेक्षणातील १७ टक्के काँग्रेस समर्थकांनाही पायलट नवा पक्ष स्थापन करतील, असे वाटते. या सर्व्हेमध्ये पायलट नवा पक्ष स्थापन करतील, असा विश्वासही २० टक्के सर्वसामान्यांना वाटतो.

भाजपमध्ये प्रवेश करणार का?

सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४८ टक्के भाजप समर्थकांना पायलट भाजपमध्ये प्रवेश करतील, तर १४ टक्के काँग्रेस समर्थकांना पायलट भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वाटते. तर या सर्व्हेनुसार पायलट भाजपमध्ये प्रवेश करतील, असंही 35 टक्के सामान्य लोकांचं मत आहे.

News Title : Rajasthan Congress C Voter Survey Assembly Election check details on 05 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rajasthan Congress(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या