30 April 2025 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

Sanjay Raut | चार ईडी अधिकाऱ्यांसह जितेंद्र नवलानीबाबत मुंबई पोलिसात तक्रार | ईडी अधिकारी रडारवर

Shivsena MP Sanjay Raut

मुंबई, 09 मार्च | शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याची पोलखोल करणार असल्याचं म्हटलं होतं. ईडीचा तो अधिकारी कोण अशी चर्चाही त्यांच्या फेब्रुवारीमधील पत्रकार परिषदेपासून सुरू होती. अखेर आज संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव घेत गंभीर आरोप केले. खंडणी वसुली करुन परदेशात बेनामी संपत्ती खरेदी केली जात आहे. ईडीच्या खंडणी रॅकेटच्या एजंटमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही असल्याचा दावा राऊत यांनी केला.

ईडीचा अधिकारी कोण, काय म्हणाले राऊत?
शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी काही धक्कादायक आरोप ईडीच्या अधिकाऱ्यांवर केले. यात काही व्यवहारांचा उल्लेख करत राऊतांनी भाजपच्या नेत्यांचाही भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचं म्हटलं आहे.

ईडी काय करतेय. मी जे पत्र दिलं आहे तो फक्त एक भाग आहे. असे मी दहा पत्र देणार आहे. मागील काही वर्षांपासून ईडीचे काही अधिकारी आणि एजंट यांचं एक नेटवर्क बिल्डर्स, डेव्हलपर्स, कॉर्पोरेट्स कंपन्यांना घाबरवण्याचं काम करत आहे.

ईडीचं एजंटचं नेटवर्क खंडणी वसुली काम करत आहे. त्याची सविस्तर माहिती मी पंतप्रधानांना दिली आहे. मी कागदपत्रांच्या आधारे बोलत आहे. ईडी अधिकाऱ्याचं जे खंडणी वसुली रॅकेट आहे. त्यातील महत्त्वाचा घटक आहे, त्याचं नाव आहे जितेंद्र चंद्रलाल नवलानी.

मी त्याचा पॅन नंबर आणि त्याच्या सात कंपन्यांची माहिती दिली आहे. या सात कंपन्यांमध्ये जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून वसुली करण्यात आली आहे. खंडणी घेतली आहे. ज्यात रोख रक्कम आहे. त्याचबरोबर चेक द्वारेही पैसे घेतलेले आहेत.

ज्या ज्या कंपन्यांची ईडीचे चौकशी केली. त्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये पैसे जमा केले आहेत. नवलानी हे ईडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मी काही उदाहरण देणार आहे. २०१७ मध्ये ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची चौकशी सुरू केली. अचानक जितेंद्र नवलानींच्या सात खात्यांमध्ये दिवाण हाऊसिंग फायनान्स आणि त्यांच्या संबंधित कंपन्यांकडून २५ कोटी रुपये जमा केले गेले.

त्यानंतर ३१ मार्च २०२० पर्यंत एस. आर. वाधवान आणि त्यांच्या कुटुंबियांकडून जितेंद्र नवलानीच्या कंपनीच्या खात्यांमध्ये आणखी १५ कोटी रुपये जमा केले गेले. याचप्रमाणे अविनाश भोसले आणि त्यांच्या कंपन्यांची ईडीने चौकशी सुरू केली. त्यानंतर लगेच अविनाश भोसले आणि त्यांच्या कंपन्यांकडून १० कोटी रुपये जितेंद्र नवलानी आणि त्याच्या सात कंपन्यांच्या नावे जमा केले गेले.

युनायटेडच्या प्रकरणातही हेच झालं. जशी ईडीची चौकशी सुरू झाली. तसं जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये १६ कोटी रुपये जमा केले गेले. गेलॉर्ड कंपनी लिमिटेड या कंपनीविरुद्ध ईडीची चौकशी सुरू होताच १० कोटी नवलानीच्या कंपनीमध्ये अनसिक्योयर्ड लोन म्हणून जमा झाले. मॉन्शर फायर विरुद्ध ईडीची चौकशी सुरू झाली, लगेच १० कोटी जमा झाले.

मी पंतप्रधानांना सांगितलं आहे की ही यादी न संपणारी आहे आणि हे पैसे फक्त नवलानीच्या कंपनीतच जमा झालेले नाहीत, तर आणखी काही लोक आहेत. ईडीच्या एजंटच्या खात्यात जमा झाले आहेत. रोख रक्कम सुद्धा दिली गेली आहे. ती आकडेवारी माझ्याकडे आहे.

ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याने कुठून पैसा घेतला. कुठे घेतला. कुठे दिला गेला. सगळी माहिती माझ्याकडे आहे. हळूहळू मी हे सांगणार आहे. कोण आहे, जितेंद्र नवलानी. कुणाचा माणूस आहे. किरीट सोमय्यांचा आणि त्याचा काय संबंध आहे.

ईडीचे सर्वात मोठे अधिकारी जे मुंबई दिल्लीचं काम पाहत आहेत, त्यांचा काय संबंध आहे? पैसे का जमा केले जात आहेत? ज्या कंपन्या सार्वजनिक बँकांच्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीये, ते जितेंद्र नवलानी आणि त्यांच्या कंपनीला कोट्यवधी रुपये का देत आहेत? कन्सलटन्सी शुल्क आहे आहे? कोणती कन्सलटन्सी सुरू आहे?

कार्यालय नाही, कर्मचारी नाही. कोणती कन्सलटन्सी सुरू आहे? हा सगळा पैसा मुंबई आणि दिल्लीत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी जमा होत आहे. त्यातून बाहेरच्या देशांमध्ये बेनामी संपत्ती खरेदी केली जात आहे आणि हे लोक आमच एक-दोन लाखांचे व्यवहार बघत आहेत. तुमचा व्यवहार कोण बघणार?”

या रॅकेटमध्ये महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेतेही सहभागी आहेत. मी हे असंच बोलत नाही, माझ्याकडे कागदपत्रं आहेत. हे गंभीर प्रकरण आहे. भ्रष्टाचार रॅकेट सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही त्रास देण्याचं काम या रॅकेटकडून केलं जात आहे. आज मी जे सांगितलं आहे, हे १० टक्के आहे.”

मी ज्या जितेंद्र नवलानी आणि रॅकेटचा उल्लेख केला आहे. त्यासंदर्भात मुंबई पोलीस गुन्हा दाखल करत आहे. जितेंद्र नवलानीसह ईडीच्या चार अधिकाऱ्यांविरुद्ध आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. मुंबई पोलीस या रॅकेटचा तपास आजपासून सुरू करत आहे. मुंबई पोलीस सक्षम आहे, या खंडणी वसुली रॅकेटचा तपास करण्यास.”

माझे शब्द लिहून ठेवा ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जातील. चोरी, खंडणी वसुली… हे कोट्यवधी रुपये कुठे जात आहेत? हे पैसे पीएम केअर फंडात जात नाहीत, तुमच्या घरात चाललाय. विदेशात चाललाय. हे रॅकेटही उघडं पाडेल. त्यात कोणते भाजपचे नेते आहेत, हेही सांगेन. वसुली एजंटामध्ये भाजपचेही नेते सहभागी आहेत.

चार ईडी अधिकाऱ्यांसह नौलानीबाबत तक्रार मुंबई पोलिसात तक्रार :
मुंबई पोलिसांत एक तक्रार आम्ही दाखल करतोय. या ‘एफआयआर’नुसार मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचाराबाबत, खंडणीबाबत तक्रार देतोय. चार ईडी अधिकाऱ्यांसह नौलानीबाबत आम्ही तक्रार करतोय. मुंबई पोलीस आजपासून याची चौकशी करत आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, मुंबई पोलीस याप्रकरणाची आजपासून चौकशी सुरू करत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena MP Sanjay Raut press Conference 08 March 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या