6 May 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

प्रति वर्ष 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्यात नापास होताच, पोलीस कॉन्स्टेबल ते डाक सहायक नियुक्ती पत्र देण्याचा पीएम मोदींचा मार्केटिंग इव्हेन्ट

PM Narendra Modi

PM Narendra Modi | नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताना दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे वाचन देशाला दिले होते. मात्र सत्तेत सलग ९ वर्ष राहूनही मोदी सरकार प्रति वर्ष २ कोटी रोजगार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्याच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरताच आता मोदी सरकारने राज्य निहाय अजब रोजगार मेळावे घेण्याचे इव्हेन्ट सुरु केले आहेत. अजब यासाठी म्हटलं, कारण दरवर्षी विविध सरकारी खात्यातील सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होतं असतात आणि सरकार त्या रिकाम्या झालेल्या जागा भरत असतं. मात्र हा सरकारी धोरणातून ‘निर्माण’ केलेला रोजगार नसतो तर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाली असलेला जागेवरील सरकारी रोजगार असतो. टीका होऊ लागताच त्याचेच आता रोजगार मेळावे भरवून मोदी सरकार इव्हेन्ट करून ते प्रसार माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी वर्ग करत असल्याचं पाहायला मिळतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याची सुरुवात मध्य प्रदेशातून केली आहे. या अंतर्गत देशातील ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला हजेरी लावली. पीएम मोदींनी ता उमेदवारांना नियुक्ति पत्र दिली. एकाच वेळी ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्रे डिजिटल स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमात रिमोट दाबून पंतप्रधान मोदींनी या देशव्यापी मोहिमेला सुरुवात केली आहे.

या सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना ट्रेन मॅनेजर, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, स्टेशन मॅनेजर, स्टोनोग्राफर, कॉन्स्टेबल, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, टीचर, लायब्ररियन आदी पदांवर नोकरी देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या देशातील भाजपशासित राज्यांमध्ये तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. बुधवारी मध्य प्रदेशातील शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. विशेष म्हणजे कर्नाटकात आणि मध्य प्रदेशात कॉग्रेस सरकार पाडून भाजप सरकार स्थापन करण्यात आलं होतं. आता कर्नाटकात पराभवाचे संकेत दिसताच, लवकरच मध्य प्रदेशात निवडणुकीत हाच मुद्दा भोवण्याच्या भीतीने मोदी साकारणे असे इव्हेन्ट थाटल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Narendra Modi Rojgar Melava in Madhya Pradesh check details on 13 April 2023.

हॅशटॅग्स

#PM Narendra Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x