30 April 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा
x

कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचं भगवं वादळ, ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी, हिंदूंसहित सर्व धर्मियांची उपस्थिती

Uddhav Balasaheb Thackeray

Uddhav Thackeray Shivsena Rally at Khed | शिवसेना पक्ष आणि धनुष बाणाचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा कोकणातील खेड येथे आज पार पडली. या सभेला विशाल असं भगवं वादळ सभेच्या ठिकाणी घोंघावताना दिसलं. या जाहीर प्रचंड सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. या सभेला हिंदू स्थानिकांसहित सर्व धर्मियांनी आपुलकीने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

मोदींचं नाव वापरून महाराष्ट्रात मत मागून दाखवा
राज्यात गुलामगिरी सहन करणार नाही. तुम्ही फक्त मोदींचं नाव वापरून महाराष्ट्रात मत मागून दाखवा. बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मागून दाखवा. मोदींच्या नावाने मत मागून दाखवा. हिंमत असेल चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुम्ही मैदानात या, मी मशाल घेऊन मैदानात येतो. निवडणुकीला सामोरं जा,’ असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदेंना दिलं आहे.

निवडणूक आयोगावर टीकास्त्र
शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली, निवडणूक आयोगाच्या नाही. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. निवडणूक येऊद्या त्यांना ठेचून टाकू. शिवसेना आमची आई आहे. ज्यांना मोठं केलं त्यांनी आपल्या आईवर वार केले. लाज वाटत नसेल तर तुमच्या आई-वडिलांचं नाव लावा आणि मैदानात या, असं चॅलेंजही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.

जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?”, असा घणाघात त्यांनी केला.

शिंदे यांनाही दबाव तंत्रावरून झापलं
महाविकास आघाडीचं सरकार चांगलं चाललं होतं. मग बिघडलं कुठे? माशी शिंकली कुठे? माशी एकाच ठिकाणी शिंकली, आज जसं राजन साळवी, बाकीचे आपले आमदार आहेत, नितीन देशमुख यांनी तर भर सभेत सांगितलं की, कसा त्यांचा छळ केला. अनिल परब आहेत, एक तोतरा थर्माकॉलचा हातोडा घेऊन येतो. पण खरा हातोडा तुला पेलेल का? आता स्वत:च्या डोक्यावर पडायची वेळ आली. केवळ छळायचं. राजन साळवींच्या घरी धाड. घराचं मोजमाप घेतात. आता परत १३ की १५ तारखेला कुटुंबियांना बोलावलं आहे. राजन साळवी काय देशद्रोही आहेत का?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Uddhav Balasaheb Thackeray Shivsena party rally at Khed check details on 05 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या