3 May 2025 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७८ हजारावर

Covid 19, Corona Virus

नवी दिल्ली, १४ मे: देशात कोरोनाव्हायरचा कहर सुरुच आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता ७८ हजार ३ झाली आहे. त्यापैकी ४९ हजार २१९ लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर पूर्णपणे निरोगी असलेल्या एकूण २६ हजार २३५ लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा २५४९ वर पोहोचला आहे.

मागील २४ तासांत ३७२२ रुग्ण वाढले असून १३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २५ हजार ९२२ पर्यंत वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्याही ९७५ वर गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो आहे. दुसरीकडे गुजरातमधील संसर्गही चिंतेचा विषय आहे. येथे ८ हजार ९०३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी राज्यात ५३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला असला, तरी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्याची मुदत काही दिवसांवर असताना राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या काळात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस, जवान, वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही करोनाचा संसर्ग होऊ लागला आहे.

मालेगाव महापालिकेच्या आयुक्तांनाही करोना झाल्याचं बुधवारी समोर आलं. दुसरीकडं देशाच्या अर्थव्यवस्थेला करोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्रानं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. याचा सविस्तर तपशील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दिला जात आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच आर्थिक आव्हान पेलवण्याचा प्रयत्न सध्या देशात सुरू आहे.

 

News English Summary: Corona virus continues to plague the country. According to figures released by the Ministry of Health and Family Welfare, the number of corona patients in India has increased to 78,003.

News English Title: 78 thousand corona covid 19 positive cases in India News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या