22 September 2023 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर? Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी?
x

आंध्र, तेलंगणात पावसाचा जोरदार तडाखा | हैदराबादेत आभाळ फाटल्याने १४ जणांचा मृत्यू

Andhra Pradesh, Telangana, Heavy Rain, 14 Killed

हैदराबाद, १४ ऑक्टोबर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यात पाऊस कोसळत असून, आंध्र प्रदेश व तेलंगानात तर अक्षरशः तांडव घातलं आहे. गेल्या २४ तासात दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पावसामुळे हैदराबादमधील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य करण्यासाठी शहरातील रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमध्ये संरक्षक भिंत कोसळली आहे. मृतांमध्ये एका २ महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. सध्या दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत. कोसळलेल्या भिंतीखाली काही जण अडकले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

हैदराबादच्या मोहम्मदिया परिसरात संरक्षक भिंत काही घरांवर कोसळली. रात्री उशिरा ही घटना घडली. यामध्ये ९ जणांनी जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्यानं परिसरात पाणी साचलं आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी ट्विट करून घटनेची आणि मदतकार्याची माहिती दिली. ‘मुसळधार पावसामुळे बंदलागुडातल्या मोहम्मदिया हिल्स परिसरातली भिंत कोसळली आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत,’ असं ट्विट ओवेसींनी केलं आहे.

 

News English Summary: Normal life has been thrown out of gear in Andhra Pradesh and Telangana as heavy rains lash the two states, leading to water-logging in several parts. At least 14 people have died in rain-related incidents in Telangana, which has been witnessing heavy rain since last two days. In Andhra Pradesh, four have reportedly died in rain-related incidents. IMD has, meanwhile, warned of thunderstorms along coastal regions in Andhra Pradesh, a day after a deep depression in the Bay of Bengal crossed the coast near Kakinada. Heavy rains are expected to lash Andhra over the next 24 hours.

News English Title: Andhra Telangana Rain 14 Killed In Heavy Rains Hyderabad News updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x