28 May 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पाकमध्ये मोदी व राज ठाकरेंबद्दल वाईट बोललं जात, मराठा रेजिमेंट जवान चंदू चव्हाण

धुळे : भारतीय लष्कराने पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर २९ सप्टेंबर या दिवशी नजरचुकीने ‘राष्ट्रीय रायफल्स’ मधील जवान चंदू चव्हाण यांना पाक हद्दीत प्रवेश केल्यामुळे त्यांना पाकिस्तान लष्कराने ताब्यात घेतले होते.

सीमारेषा ओलांडली म्हणून पाकिस्तानच्या तुरुंगात चार महिने राहिलेले २३ वर्षीय ‘मराठा रेजिमेंटचे’ जवान चंदू चव्हाण यांनी एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान मध्ये घडलेल्या सर्व प्रकारची पोलखोल केली आहे.

सर्व प्रसंगाचे वर्णन करताना चंदू चव्हाण म्हणाले की, पाकिस्तानातील तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या वाईट प्रकारे छळ करण्यात आला होता. तसेच मला वारंवार भारताविरुद्ध बोलण्यास प्रवृत्त करण्यात येत होते. पाकिस्तानमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल वाईट बोललं जात असं जवान चंदू चव्हाण यांनी अनुभवलेल्या प्रसंगातून सांगितलं.

परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांमुळे जवान चंदू चव्हाण यांची गेल्या वर्षी २१ जानेवारी रोजी पाकिस्तानने सुटका करून भारताच्या स्वाधीन केले होते. २०१२ मध्ये लष्करात भरती झालेले चंदू चव्हाण हे ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असून ते 9 मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x