‘मोटार वाहन दुरुस्ती’ बिल आज लोकसभेत पास झालं आहे. हे बिल जर लागू झालं तर चालक परवाना आणि वाहन नोंदणीसाठी आधार नंबर अनिवार्य असेल. परंतु हे बिल लागू करण्यासाठी राज्यसभेमध्ये हे बिल पास व्हायला हवं. या बिलामध्ये ट्राफिक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोटार वाहन दुरुस्तीचं बिल सादर केलं. जगात भारतातच सहज चालक परवाना मिळतो. भारतात ३० टक्के चालक परवाने हे खोटे आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

चालक परवाना वयोमर्यादा होणार कमी

सद्यस्थितीत चालक परवाना २० वर्षांसाठी वैध आहे. परंतु ही मर्यादा कमी करून आता १० वर्षे केली जाणार आहे. १० वर्षांनंतर परवान्याचं नूतनीकरण करावं लागेल. तसंच ५५ वर्षांच्या वरील व्यक्तींना चालक परवाना केवळ पाच वर्षांसाठी वैध राहील.

आता चालक परवान्यासाठी ‘आधार’ हवा