2 May 2025 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Babri Case | निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया

Babri Demolition Case,  32 Accused, LK Advani Acquitted

लखनऊ, ३० सप्टेंबर : तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व म्हणजेच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिलाय. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.

याआधी सेशन ट्रायल क्रमांक 344/1994, 423/2017 आणि 726 / 2019 सरकार विरुद्ध पवन कुमार पांडे आणि वरील प्रकरणातील सर्व सुनावणी 16 सप्टेंबर रोजी संपली होती. त्यानंतर सुरेंद्र कुमार यादव, पीठासीन अधिकारी, विशेष न्यायालय, अयोध्या केस लखनऊ यांनी 30 सप्टेंबर 2020 रोजी निर्णय देण्याची तारीख निश्चित केली. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते, त्यापैकी 32 सध्या जिवंत आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे. जण मरण पावले आहेत. या खटल्यात भाजप नेते एल के अडवाणी, मुरली मनोहर जोशी या दिग्गजांची आरोपी म्हणून नावं होती.

दरम्यान, बाबरी मशीद प्रकरणी लखनऊच्या विशेष न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाकडून सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अडवाणी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून आपण आनंदी असल्याचं म्हटलं आहे. निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत आपला विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अडवाणी यांनी म्हटलं आहे की, “बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपाचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते”.

 

News English Summary: The Babri mosque demolition was not planned, a judge in Uttar Pradesh said today, acquitting all accused including BJP leaders LK Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti. The verdict in the 28-year-old case involving the demolition of Babri Masjid, which stood at the Ram Janmabhoomi site in Ayodhya was announced by a special court in +Lucknow.

News English Title: Babri Demolition Case LK Advani Acquitted Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या