4 May 2025 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER
x

सोशल मीडियावरील एका चिथावणीखोर पोस्टने बंगळुरूमध्ये हिंसाचार भडकला

Bangalore, violence, Social Media Post

बंगळुरू, १२ ऑगस्ट : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये मंगळवारी रात्री सोशल मीडियावरील एका चिथावणीखोर पोस्टने हिंसाचार भडकला. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनाही गोळीबार करावा लागला, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक झालेल्या हिंसाचारात अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह सुमारे ६० पोलिस जखमी झाले आहेत. बेंगळुरूच्या डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस स्टेशन भागात बर्‍यापैकी गोंधळ उडाला. त्यानंतर डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बेंगळुरूमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. दरम्यान, चिथावणीखोर पोस्ट टाकणारा आरोपी नवीनला अटक करण्यात आल्याचं बेंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितलं.

ANI च्या वृत्तानुसार, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी एकाच ठिकाणी येत कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाण्यावरही संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. अनेक गाड्यांना आग लावण्यात आली तर हिंसाचार रोखण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांवरच दगड आणि बाटल्यांनी मारहाण करण्यात आली.

श्रीनिवास मूर्तींच्या घरासोबतच जमावाने बंगळुरू पूर्वेला असलेल्या के. जे. हाली पोलीस ठाण्यावरही हल्ला केला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. यानंतर परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Three people were killed in police firing in Bengaluru and 60 police personnel injured, the city’s police chief told media, as violence broke out in the eastern part of the city on Tuesday night over a Facebook message posted allegedly by a relative of a Congress MLA. 110 people have been arrested for violence, stone-throwing and assault on police personnel.

News English Title: Bangalore 2 dead 110 arrested after violence erupts over social media post News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या