3 May 2025 12:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO
x

महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा एक मोठं नाटक : भाजप खा. अनंतकुमार हेगडे

BJP leader MP Anantkumar Hegde, Mahatma Gandhi

बेंगळुरू: बेंगळुरूतील एका कार्यक्रमावेळी भाजपचे नेते अनंतकुमार हेगडेंनी महात्मा गांधींबद्दल धक्कादायक वक्तव्य केले. अनंतकुमार हेगडे हे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. स्वातंत्र्यलढा हा ब्रिटीश सरकारच्या संमती आणि पाठिंब्याने रचला गेला होता. या तथाकथीत नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. ही खरीखुरी लढाई नव्हती. हा परस्पर संगनमताने रचलेला स्वातंत्र लढा होता, असे वक्तव्य हेगडे यांनी केले.

“त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह ही देखील ढोंगं होती, देशात लोक काँग्रेसला पाठिंबा देताना सांगतात की, त्यांच्या आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, हे खरं नाही. ब्रिटिशांनी सत्याग्रहामुळे देश सोडलेला नाही,” असंही अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं आहे.

जे लोक काँग्रेसला पाठिंबा देत आहेत ते म्हणतात की आमरण उपोषणामुळे आणि सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र हे खरं नाही. ब्रिटीश सत्याग्रहामुळे भारत सोडून गेले नाही. ब्रिटिशांनी निराशेतून भारताला स्वातंत्र्य दिलं. जेव्हा मी इतिहास वाचतो तेव्हा माझं शरिरातील रक्त खवळतं. आपल्या देशात कसे लोक महात्मा झाले आहेत, असंही हेगडे म्हणाले. दरम्यान, भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाही. त्यांनी याआधी अनेकदा अशी वक्तव्यं दिली आहेत.

 

Web Title:  BJP leader MP Anantkumar Hegde statement on freedom struggle and Mahatma Gandhi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या