30 April 2025 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

उशिरा सुचलेलं शहाणपण? गोडसे विधानावरून प्रज्ञा ठाकूरची संरक्षण समितीवरून हकालपट्टी

Pragya Singh Thakur, Defense Advisory Committee

नवी दिल्ली: बुधवारी लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती. यावर डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी आपले मत मांडले. यावेळी नथुराम गोडसेंच्या एका विधानाचा संदर्भ देत होते. यावेळी भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) यांनी त्यांना थांबवत तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण कसे काय देऊ शकता, असा सवाल केला होता. यावरून लोकसभेत गदारोळ उडाला होता. आज प्रज्ञा सिंह ठाकूरना संरक्षण मंत्रालयाच्या समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत (Defense Advisory Committee) स्थान देण्यात आले होते. साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत होत्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sandhvi Pragya Singh Thakur) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रत्येकवेळी भारतीय जनता पक्षाकडून स्पष्टीकरण दिले जाते. तसेच वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना इशारा दिला जातो. त्यानंतरही त्यांचे वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच आहे. साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गोडसेला देशभक्त म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील (Malegaon Bomb Blast Case) संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तत्पूर्वी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भयानक दहशदवादी हल्ल्यात अनेक निर्दोष नागरिकांसह वरिष्ठ तसेच कनिष्ठ पोलीस देखील शहीद झाले होते. दरम्यान, त्या हल्ल्यात अजमल कसाब या दहशदवाद्याला जिवंत पकडताना हवालदार तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हेमंत करकरे तसेच विजय साळसकर (Shahid Hemant karkare and Vijay Karkare) यांच्यासह अनेक धाडसी अधिकारी मुंबई पोलिसांनी गमावले होते.

परंतु त्याच शहीद अधिकाऱ्यांच्या मृत्यूवरून मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील विद्यमान खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी धक्कादायक विधान केलं होतं. हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं असं संतापजनक वक्तव्य भोपाळ येथे उपस्थितांना संबोधित करताना केलं होतं. विशेष म्हणजे अनेक भारतीय जनता पक्ष समर्थकांनी या संबंधित बातम्या व्हिडिओ सकट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ‘लव’ इमोजीद्वारे व्यक्त होत, स्वतःच्या भावना कोणत्या थराला जाऊन पोहोचल्या आहेत याचा पुरावा दिला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या