पोलीस व्हॅनमध्ये बचाओ-बचाओ बोंबलत होता | बाहेर आल्यावर नेल्सन मंडेला बनतोय

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर: वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश देखील दिले होते.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे,” असं देखील ते यावेळी म्हणाले. “उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असंही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, सुरक्षेच्या कारणावरून अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात पोलीस व्हॅनने घेऊन जात असताना संपूर्ण देशाने पाहिले होते. त्यावेळी धास्तावलेल्या अर्णब गोस्वामी यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा कांगावा सुरु केला होता. विशेष म्हणजे त्याच वेळी ओरडत त्याने केंद्र सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालावं अशी देखील ऑन कॅमेरा ओरड सुरु केली होती.
मात्र तुरुंगातून बाहेर पडताच त्याने तुरूंगाबाहेरच खुलेपणाने जल्लोष केल्याचा देखील देशाने पाहिलं आहे. तुरुंगात जीवाला धोका असल्याचा कांगावा करणारा अर्णब गोस्वामी तुरूंगाबाहेरच जल्लोष करताना स्वतःला नॅशनल हिरो असल्याचं भास निर्माण करू लागला आहे. त्यालाच अनुसरून आचार्य प्रमोद यांनी अर्नब गोस्वामी यांची खिल्ली उडवली आहे. या संदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे कि, ‘पोलीस व्हॅनमध्ये बचाओ-बचाओ बोंबलत होता, बाहेर आल्यावर नेल्सन मंडेला बनतोय.’
पुलिस वैन में बचाओ बचाओ “चिल्ला”
रहे थे,और अब “नेलसन” मंडेला बन रहे हो. pic.twitter.com/H9H3dOq1I8— Acharya Pramod (@AcharyaPramodk) November 12, 2020
News English Summary: The country has also seen him openly chanting outside the jail as soon as he was released. Arnab Goswami, who has been claiming that his life is in danger in jail, has started pretending to be a national hero while protesting outside the jail. Accordingly, Acharya Pramod has ridiculed Arnab Goswami. In a tweet, he said, “There was a rescue bombing in the police van, and when it came out, it turned out to be Nelson Mandela.”
News English Title: Congress leader Acharya Pramod troll Arnab Goswami for his comment on Republic TV News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER