7 May 2025 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

लस निर्यात, कंट्रोल, पुरवठा आणि नियम करतात मोदी | तुटवड्याला ठाकरे, नेहरू जवाबदार

Congress , Srivatsa, corona vaccination

मुंबई, ९ एप्रिल: सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होतं.

प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला होता. तसेच राज्य सरकारला केंद्राने किती लशी पुरवल्या याचा आकडाही त्यांनी सांगितला होता. यासोबतच पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच योग्य प्रकारे केले जात नाही. एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिले जातात. त्याचं व्यवस्थित नियोजन करायला हवे. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे.’

यावर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राजेश टोपे म्हणाले होते की, ‘लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.’

आता यावरून काँग्रेसचे कर्नाटकातील नेते श्रीवत्स यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. या संदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “लसींची निर्यात कोणी केली?.. मोदीजी, लस प्रक्रिया कोण नियंत्रित करतंय? मोदीजी… लस वितरण कोण नियंत्रित करतंय? मोदीजी… लस कोणाला मिळते यावर नियम कोण ठरवतंय? मोदीजी…. लसीच्या कमतरतेसाठी कोण जबाबदार आहे? उद्धव ठाकरे आणि जवाहरलाल नेहरू….संपूर्ण पॉलिटिकल सायन्स लॉजिक

 

News English Summary: Now, Congress leader from Karnataka Shrivats has taken to Twitter to lash out at the Modi government. In this context, while tweeting, he has said, “Who exported the vaccines? .. Modiji, who controls the vaccine process? Modiji … Who controls the vaccine distribution? Modiji … Who sets the rules on who gets the vaccine? Modiji .. .. Who is responsible for the lack of vaccines? Uddhav Thackeray and Jawaharlal Nehru

News English Title: Congress leader Srivatsa slams Modi govt over politics of corona vaccination news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या