1 May 2025 5:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

मला कुठल्याही चौकात बोलवा म्हणता | शेटजी, शेतकऱ्यांच्या सिंघु बॉर्डर चौकात जा की

Congress MLA Bhai Jagtap, PM Narendra Modi, Farmers Protest, Delhi border

मुंबई, ९ डिसेंबर: मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हनन मुला (Farmers Leader Hanan Mula) यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. कृषी कायद्यातील सुधारणांबाबत केंद्र सरकार आज आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना लिखित प्रस्ताव देणार आहेत. या प्रस्तावावर शेतकरी विचार करणार आहेत. दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारसोबत होणारी बैठक होणार नसल्याचे देखील हनन मुला यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

केंद्राचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटत असले तरी पंतप्रधानांनी एकदाही आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतलेली नाही. दरम्यान, नोटबंदीच्या वेळी मला फक्त पन्नास दिवस द्या आणि त्यानंतर मी तुमच्यासमोर कोणत्याही चौकात यायला तयार आहे आणि तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल असं मोदींनी म्हटलं होतं. त्याचाच धागा पकडून काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

मोदींच्या नोटबंदी दरम्यानच्या त्या वाक्याचा सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी संबंध जोडत भाई जगताप यांनी ट्विट केलं आहे कि, “”मला कुठल्याही चौकात बोलवा”, असं ते वारंवार म्हणतात. शेटजी, शेतकऱ्यांनी ‘सिंघु बॉर्डर चौका’त बोलवलंय….जा की!”

 

News English Summary: Although the Center representatives are meeting the farmers, the Prime Minister has never met the agitating farmers. Meanwhile, Modi had said that give me only fifty days at the time of denomination and after that I am ready to come in front of you in any square and I will accept the punishment you give me. Following the same thread, Congress leader Bhai Jagtap has slammed Modi.

News English Title: Congress MLA Bhai Jagtap slams PM Narendra Modi over Farmers Protest at Delhi border news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या