12 May 2025 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

सूर्य, चंद्र आणि सत्य अधिक काळ लपून राहत नाहीत असं गौतम बुद्धांनी म्हटलं आहे - राहुल गांधी

Congress MP Rahul Gandhi, Guru Poornima, Narendra Modi, Gautam Buddha

नवी दिल्ली, ५ जुलै : संस्कृती मंत्रालयाच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघाद्वारे (IBC) आषाढ पौर्णिमा धर्मचक्र दिनाच्या रुपात साजरी केली जाते. काल आषाढ पौर्णिमेलाच तथागत गौतम बुद्धाने आपल्या पहिल्या ५ शिष्यांना धर्माचा प्रथम उपदेश दिला. या दिनाला धर्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात. हा दिवस संपूर्ण जगात बौद्ध लोक दरवर्षी हा दिवस धर्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात. तर हिंदू धर्मीय हा दिवस गुरू पौर्णिमा म्हणून साजरा करतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात धर्मचक्र प्रवर्तन दिनाचे उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित केले होते.

बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाने अनेक समाज, अनेक देश आज मार्गक्रमण करत आहेत. या मार्गातून करूणा आणि दयेचा मार्ग अधोरेखित होतो. बुद्धाचा मार्ग आपल्याला आपल्या विचारातील आणि आचारातील साधेपणा शिकवतो असं मोदी म्हणाले. बौद्ध धर्म सन्मान शिकवतो. लोकांचा सन्मान, गरिबांचा सन्मान करा, महिलांचा सन्मान करा, शांती आणि अहिंसेचा सन्मान करा. म्हणून बौद्ध धर्माची शिकवण एक स्थिर ग्रहाचे साधन आहे असं देखील मोदी म्हणाले.

दरम्यान, लडाख’मधील गलवाण खोऱ्यात भारत चिनी सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते तर चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली नाही. दुसरीकडे मोदींनी देशाला संबंधित करताना भारतीय हद्दीत कोणतीही घुसखोरी झालेली नाही असं म्हटल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तर दुसरीकडे लडाखमधील स्थानिक लोकं चीनने भारताचा भूभाग ताब्यात घेतल्याचे व्हिडिओ व्हायरल करत असून मोदी देशाला फसवत असल्याचं म्हटलं आहे.

त्यालाच अनुसरून राहुल गांधी यांनी गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना पंतप्रधांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. याबाबत ट्विट करताना राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, “सूर्य, चंद्र आणि सत्य या तीन गोष्टी अधिक काळ लपून राहत नाहीत असं गौतम बुद्धांनी म्हटलं आहे…तुम्हा सर्वाना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!

 

News English Summary: While wishing on the occasion of Guru Pournima, the Prime Minister has also been indirectly targeted. Tweeting about this, Rahul Gandhi said, “Sun, Moon and Truth are not hidden for a long time. Gautam Buddha has said News Latest Updates.

News English Title: Congress MP Rahul Gandhi wishes everyone on Guru Poornima News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या