3 May 2025 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

ईडी'नंतर NIA'च्या कंट्रोल रुममध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Corona patients, National Investigation Agency, NIA, Covid 19

नवी दिल्ली, ६ जून: देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ३६ हजारांच्या वर गेला आहे. देशातील प्रमुख राज्यांसह इतर छोट्या-मोठ्या राज्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आता दिल्लीतील नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजंसी (एनआयए) मध्येही कोरोना रुग्ण आढळले असून त्यांच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए कंट्रोल रुममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्याने संपूर्ण कार्यालय सॅनिटाइझ करण्यात आले आहे. तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काल(दि.५) ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आलं असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

 

News English Summary: The number of corona viruses is increasing day by day in the country. The number of corona patients has gone up to 2 lakh 36 thousand. Corona has infiltrated major states of the country as well as other small and large states. Corona patients have now been found in the National Investigation Agency (NIA) in Delhi and corona patients have been found at their headquarters.

News English Title: Corona patients have now been found in the National Investigation Agency NIA in Delhi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या