26 September 2020 7:41 PM
अँप डाउनलोड

कर्नाटक पालिका निवडणुक: बॅलेट पेपरने १ महिन्यात मोदी त्सुनामी गायब; काँग्रेस ५०९ जागांसह मोठा पक्ष

Narendra Modi, Amit Shah, Loksabha Election 2019

बंगळुरू: लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामी आली असली तरी एका महिन्यानंतर कर्नाटकात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोदी त्सुनामी गायब झाली असून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे अनेकांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील २८ जागांपैकी काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली आहे. तर भारतीय जनता पक्षाने तब्बल २५ जागांवर विजय मिळवला आहे. सत्ताधारी जेडीएस आणि अपक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने ईव्हीएमबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कर्नाटकात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. २० जिल्ह्यातील १२२१ जागांवर २९ मे रोजी निवडणुका घेण्यात आल्या. त्यात काँग्रेसने एकूण ५०९ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाला ३६६ तर जेडीएसला १६० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांना १६० जागा मिळाल्या आहेत. दुसरी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. तरीही काँग्रेसने या निवडणुकीत लक्षणीय यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे या निवडणुका बॅलेट पेपरने घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या या निवडणुकीत जनता काँग्रेसच्या पाठिशी असल्याचे दिसून आले आहे, असे स्पष्ट करत काँग्रेसने ईव्हीएमबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेसने ४२ टक्के जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीत पराभव कसा झाला असा सवाल काँग्रेसच्या दिनेश गुंडू राव यांनी केला आहे.

काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘पुन्हा एकच प्रश्न…कर्नाटकात बॅलेट पेपरद्वारे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवणाऱ्या भाजपच्या पराजयामुळे ईव्हीएमबाबत साशंकता उत्पन्न होत आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी ईव्हीएमबाबत होणाऱ्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणुकीनंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांचा ताळेबंद योग्य आल्याने ईव्हीएमबाबत शंकेला जागा नसल्याचेही आय़ोगाने स्पष्ट केले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)#Narendra Modi(1318)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x