बिहार: पाचव्या टप्यातील मतदानावेळी हॉटेलमध्ये आढळल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स

पाटणा : सोमवारी बिहारमध्ये ५व्या टप्प्यासाठी मतदान सुरु असताना मुझफ्फरपूर येथील एका हॉटेलमध्ये २ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. विशेष म्हणजे हे हॉटेल मतदान केंद्रापासून अगदी जवळच्या अंतरावर होतं. हॉटेलमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याची माहिती मिळताच अनेक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. सविस्तर वृत्तानुसार, सेक्टर मॅजिस्ट्रेट अवदेश कुमार यांच्याकडे मुझफ्फरपूर येथील ४ ईव्हीएम मशीन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परिसरातील एखादं ईव्हीएम मशीन खराब झाल्यास बॅकअप म्हणजे अतिरिक्त मशीन्स ठेवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, मुझफ्फरपूर येथून मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हरने आपल्याला मतदान करायचं असल्याने थोडा वेळ मागितला. यावेळी अवदेश कुमार हॉटेलमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिटसोबत उतरले होते. काही वेळात निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेलमध्ये थांबले असल्याची बातमी परिसरात पसरली. कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करत आंदोलन करण्यास सुरुवात केली.
Bihar:EVMs&VVPAT were found from a hotel in Muzaffarpur yesterday. Alok Ranjan Ghosh, DM says,”Sector officer was given some reserved machines so that it could be replaced with faulty ones. After replacing EVMs he was left with 2 balloting unit,1 control unit&2 VVPAT in his car.” pic.twitter.com/KjpoKbHpCa
— ANI (@ANI) May 7, 2019
यानंतर काही वेळातच उप-विभागीय अधिकारी कुंदन कुमार हॉटेलमध्ये पोहोचले आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन्स जप्त केल्या. ‘सेक्टर ऑफिसरला काही आरक्षित अतिरिक्त मशीन्स देण्यात आल्या होत्या. जेणेकरुन एखादी मशीन खराब झाल्यास ती बदली करता येईल. ईव्हीएमची बदली केल्यानंतर त्यांच्याकडे २ ईव्हीएम, १ कंट्रोल युनिट आणि २ व्हीव्हीपॅट त्यांच्या राहिल्या होत्या’, अशी माहिती मुझफ्फरपूरचे जिल्हा दंडाधिकारी आलोक रंजन यांनी दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL