24 April 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

केंद्राकडून आंदोलक शेतकऱ्यांचे हाल | पिण्याचं पाणी, शौचालयांपासून ठेवलं वंचित

Five feet high security, barriers, Delhi border, Farmers Protest

नवी दिल्ली, ०३ फेब्रुवारी: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर काँक्रीटचं बांधकाम करत या भिंती उभारुन दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केलीय. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

मात्र दिल्ली पोलिसांच्या या वागणुकीमुळे शेतकरी आंदोलकांमध्ये कमालीचा रोष आहे. तरीही आंदोलन थांबणार या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. “आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर बोअरवेल खणून पाणी मिळवू पण आम्ही घाबरुन जाऊ असा सरकारने अजिबात विचार करू नये. जोवर आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होत नाही तोवर आम्ही इथून माघारी जाणार नाही”, असं शेतकरी आंदोलक कुलजित सिंग म्हणाले.

दरम्यान, शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी गाझीपूर बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर तारांचं कुंपण घालण्यात आलं असून रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी आंदोलकांना अडवण्यासाठी भररस्त्यात भिंती उभारण्यात आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती सारखं वातावरण गाझीपूर बॉर्डरवर तयार करण्यात आलं असल्याने त्यावर राष्ट्रवादीने संताप व्यक्त केला आहे. मोदी सरकारला शेतकऱ्यांसोबत युद्ध करायचे आहे का? असा सवाल राष्ट्रवादीने व्यक्त केला आहे.

 

News English Summary: The Delhi Police has erected four to five feet high security barriers at the Delhi border at Singhu, Tikri and Ghazipur to prevent farmers from entering Delhi against the Modi government’s agricultural laws. The Delhi Police has erected concrete walls on national highways and set up a blockade to prevent protesters from entering the United Kisan Morcha. Beyond this wall, barricades, nails, iron poles and wires have been erected for one and a half Kilometers.

News English Title: Five feet high security barriers at the Delhi border at Singhu Tikri and Ghazipur borders news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x