24 March 2025 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | खाजगी कर्मचाऱ्यांना अपडेट, 25000 पगार असणाऱ्यांना EPF चे 59,41,115 रुपये आणि रु.6000 पेन्शन मिळणार Sandeep Deshpande | मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी नेमणूक झालेले संदीप देशपांडे पक्षाला उभारणी देणार का? त्यांच्या कार्याचा आढावा Raj Thackeray | विधानसभेत लोकप्रतिनिधी कमी आणि 'खोके भाई'च जास्त दिसतात, स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात Sushant Singh Rajput | CBI क्लोजर रिपोर्टमध्ये बोगस नेत्यांचंही भांडं फुटलं, ना विष प्रयोग, ना गळा दाबला, ती आत्महत्याच होती Rattan Power Share Price | तुफानी तेजीमुळे 10 रुपयाच्या शेअर फोकसमध्ये, पुन्हा मल्टिबॅगर परतावा मिळेल? - NSE: RTNPOWER SBI Special FD Scheme | सर्वाधिक परतावा देणाऱ्या SBI स्पेशल FD योजना अनेकांना माहित नाहीत, इथे पैसे गुंतवा Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 24 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

गुजरात दंगल प्रकरणी मोदींना क्लीन चीट दिल्यानंतर विरोधकांकडून माझा छळ

Former CBI Direcor Rk Raghavan, Clean Chit To Narendra Modi, Gujarat Riot Probe

नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर: गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप सीबीआयचे माजी संचालक आर.के.राघवन यांनी केला आहे. आर.के.राघवन यांचे “A Road Well Travelled” आत्मचरित्र प्रकाशित झाले असून यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नरेंद्र मोदींविरोधात कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती.

“माझ्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांची बाजू घेण्यात आल्याचा आरोप झाला. माझ्या फोनवरील संभाषणांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. पण काहीही ठोस न मिळाल्याने त्यांची निराशा झाली,” असं राघवन यांनी पुस्तकात म्हटलं आहे. “२००२ गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींची सलग नऊ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान नरेंद्र मोदींनी तपास अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या १०० पैकी एकही प्रश्न टाळला नाही. संपूर्ण चौकशीदरम्यान ते अत्यंत शांत होते. नऊ तासांच्या या चौकशीत त्यांनी साधा चहादेखील स्वीकारला नाही,” असा खुलासा राघवन यांनी केला आहे. “तपासासाठी नरेंद्र मोदींना गांधीनगरमधील एसआयटी कार्यालयात येण्याची तयारी दर्शवली तसंच सोबत पाण्याची बाटली आणली होती,” अशी माहिती दिली आहे.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना चौकशीसाठी बोलावण्यासंबंधी सांगताना त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, “आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना एसआयटी चौकशीसाठी एसआयटी कार्यालयात यावं लागेल असं कळवलं होतं.इतर कोणत्या ठिकाणी ही चौकशी करणं चुकीचा संदेश देणारं ठरलं असतं. मोदींनी आमच्या निर्णयाचं महत्व समजलं आणि ते एसआयटी कार्यालयात येण्यास तयार झाले”.

राघवन यांनी मोदी आणि आपल्यामध्ये काही ठरलं होतं असे आरोप होण्याची शक्यता असल्याने एसआयटी सदस्य अशोक मल्होत्रा यांना चौकशी करण्यास सांगितलं होतं. “जवळपास नऊ तास मोदींची चौकशी सुरु होती. संपूर्ण चौकशीदरम्यान नरेंद्र मोदी शांत होते. रात्री उशिरापर्यंत ही मॅरेथॉन चौकशी सुरु होती,” असं राघवन यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: Former CBI director RK Raghavan, in his autobiography, has said that he faced harassment from PM Narendra Modi’s rivals for concluding that there was no evidence of the then Gujarat CM’s complicity in the 2002 Gujarat riots. “They engineered petitions against me, accusing me of favouring the CM. The grapevine had it that they misused central agencies to monitor my telephonic conversations. They were disappointed not to find anything incriminating,” Raghavan has written in his autobiography ‘A Road Well Travelled’.

News English Title: Former CBI Direcor Rk Raghavan On Clean Chit To Narendra Modi In Gujarat Riot Probe News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या