स्वत:वर कोरोना लशीची चाचणी करायची असल्यास 'या' असतात अटी
नवी दिल्ली, २३ ऑगस्ट : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) करोनावरील लशीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी परीक्षणासाठी स्वयंसेवकाच्या शोधात आहे. या परीक्षणात सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत. तुम्ही त्या अटी पूर्ण केल्यास तुमच्या इच्छेनुसार करोना लशीची चाचणी तुमच्यावर केली जाऊ शकते. आतापर्यंत या चाचणीत सहभागी होण्याची सुमारे १००० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे.
आम्हाला १०० स्वयंसेवकांची गरज होती मात्र, आमच्याकडे सतत फोन येत राहिले. लोक व्हॉट्सअॅपच्या माध्यामातूनही चाचणीत सहभाग नोंदवण्यासाठी विनंती करत आहेत. या व्यतिरिक्त आम्हाला ईमेलद्वारे देखील शेकडो लोकांनी विनंती केली आहे, असे एम्स दिल्लीते कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले.
या आहेत अटी:
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिचर्सचे (ICMR) प्रवक्ता डॉ. रजनीकांत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही निरोगी प्रौढ भारतीय काही अटींसह या लशीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतो. या चाचणीत सहभागी होण्यासाठी व्यक्तीचे वय १८ वर्षे ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार असता कामा नयेत. तो पूर्णपणे निरोगी असला पाहिजे. या चाचणीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला एखादी दुखापत झाल्यास किंवा काही रिअॅक्शन झाल्यास त्या परिस्थितीत नुकसान भरपाई वगळता पैसे दिले जात नाहीत.
स्वयंसेवकाची घेतली जाते ब्लड टेस्ट:
स्वयंसेवकाचा एक स्वॅब नमुना रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमरेज चेन रिअॅक्शनसाठी (RRT-PCR) घेतला जातो. याद्वारे स्वयंसेवकाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग आहे किंवा नाही हे पाहिले जाते. आम्हाला असे स्वयंसेवक हवे असतात त्यांना वर्तमानात आणि भूतकाळात देखील संसर्ग झालेला नसावा, असे डॉ. राय म्हणाले. याद्वारे अँटीबॉडी आणि आरोग्याशी संबंधित इतर तपासण्यांसाठी ही रक्त चाचणी करण्यात येते.
अशी होते स्वयंसेवकांची निवड:
एम्सचे डॉ. राय यांनी माहिती देताना सांगितले की, या चाचणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी एक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जात आहे. मापदंड पूर्ण करणाऱ्या पहिल्या १० अर्जदारांना चाचणीसाठी निवडले जात आहे. सर्वसाधारणपणे २५ ते ३० टक्के अर्ज बफरच्या रुपात वेगळे ठेवले जातात. एकदा का बेसिक स्क्रीनिंग झाले की मग अर्जदारांना चाचणीसाठी सादर व्हावे लागते. सर्वप्रथम त्यांची कोविड-१९ची तपासणी केली जाते.
दुसरीकडे पुढील 73 दिवसात भारतात कोरोनाची लस उपलब्ध होईल, असा दावा सीरम आणि ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूटने केला आहे. तसेच ही लस सर्वांना मोफत मिळणार आहे. भारत बायोटेक या कंपनीने बनवलेल्या Covaxin ही कोरोनाची लस या वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होईल. 2021 वर्षाच्या पहिले तीन महिने ही कोरोना लस आपण वापरु शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी दिली.
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जगभरात कोरोना लस निर्मितीवर भर दिला जात आहे. भारतीय कंपनीने बनवलेली कोरोना लस येत्या वर्षाअखेरपर्यंत तयार होऊ शकते. त्यानंतर ही लस परिणामकारक आहे का हे समजू शकेल. तसेच सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडिया पहिल्यापासूनच ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत एकत्रित कोरोनाची लसीचे उत्पादन करत आहे. जेणेकरुन लवकरात लवकर कोरोना लसीची निर्मिती होईल. तर इतर दोन स्वदेशी लस तयार करण्यासाठी आणि बाजारात येण्यासाठी कमीत कमी एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या वर्षाअखेरपर्यंत कोरोनाची स्वदेशी लस बाजारात उपलब्ध होण्याची अपेक्षा वर्तवली आहे.”
News English Summary: The All India Institute of Medical Sciences (AIIMS) is looking for volunteers for the first phase of the human trial of corona vaccine. There are certain conditions for participating in this test. If you meet those conditions, you can be tested for the corona vaccine as you wish. So far, about 1,000 people have expressed a desire to take part in the test.
News English Title: Human trial of corona vaccine do you want to Enroll in a corona vaccine trial know eligibility News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News