1 May 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
x

चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार | सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा

China India, Military action, CDS Bipin Rawat

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट : लडाख परिसरातील चीनकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात सध्या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरल्यास भारताला लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे, असे वक्तव्य संरक्षण दलांचे प्रमुख CDS बिपीन रावत यांनी व्यक्त केले. एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर सातत्याने बोलणी सुरु आहेत. मात्र, लडाखच्या अनेक भागांमध्ये भारतीय हद्दीतील सैन्य मागे घेण्यास चीन अद्याप तयार नाही.

या पार्श्वभूमीवर बिपीन रावत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे. त्यांनी म्हटले की, लडाखमध्ये चिनी सैन्याच्या घुसखोरीसंदर्भातील मुद्दा लष्करी चर्चा किंवा राजनैतिक पातळीवर न सुटल्यास भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय सैन्य आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्य़ान, एलएसीवर वाद सोडविण्यासाठई भारत आणि चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून अनेकदा सैन्य अधिकाऱ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. यामध्ये लेफ्टनंट, जनरल स्तरावरील चर्चा आहेत. राजनैतिक स्तरावरही चर्चा सुरु आहेत. संयुक्त सचिव स्तराचे अधिकारी चीनसोबत चर्चा करत आहेत. दोन्ही बाजुंकडून चीनवर तणाव कमी करण्यावर बोलणी केली जात आहेत.

मात्र, अद्यापही एलएसी वादावर तोडगा निघालेला नाही. फिंगर आणि डारला भागात चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी युद्धाभ्यास करत आहे. अशातच रावत यांनी सैन्य पर्यायाचे वक्तव्य करत चीनला मोठा इशारा दिला आहे.

 

News English Summary: Chief of Defence Staff (CDS) General Bipin Rawat on Monday stated that India has “military options” to deal with the Chinese on the issue of transgressions if talks between both the countries at the military and diplomatic level don’t yield any results.

News English Title: If talks fails with China India finally consider military action CDS Bipin Rawat warning News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या