नवी दिल्ली, २३ जुलै : कोरोनाबाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत असले तरी दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी देशभरात ४५ हजार ७२०रुग्ण सापडले. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ झाली आहे. तर काल दिवसभरात देशात एकूण १ हजार १२९ कोरोनाबाधिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाबळींची संख्या २९ हजार ८६१ वर पोहोलची आहे. देशात सद्यस्थितीत ४ लाख २६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७ लाख ८२ हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 

News English Summary: Although the recovery rate of corona patients is increasing day by day, the number of corona patients is increasing day by day. According to the Ministry of Health, 45,720 corona patients have been found in the country in the last 24 hours.

News English Title: India Covid19 Case Tally Crosses 12 Lakh Mark With Highest Single Day News Latest Updates.

भीषण  वाढ! २४ तासांत देशभरात ४५,७२० नवे रुग्ण, तर १,१२९ रुग्णांचा मृत्यू