26 July 2021 3:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, ०६ मे : कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ही दुसरी वेळ आहे, जेव्हा देशात 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. यापूर्वी, 30 एप्रिलला 4 लाख 2 हजार 14 रुग्णांची नोंद झाली होती आणि 3525 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ठीक झालेल्या रुग्णांचा आकडाही कालपेक्षा कमी आहे. मंगळवारी देशात 3.37 लाख रुग्ण ठीक झाले होते, तर आज 3.24 लाख रुग्ण ठीक झाले आहेत.

दररोज मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आता महाराष्ट्रानंतर कर्नाटक आणि केरळचा नंबर लागत आहे. कर्नाटकात बुधवारी 50 हजारांपेक्ष जास्त, तर केरळमध्ये 41,953 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

  • देशात 24 तासात नवे रुग्ण – 4,12,262
  • देशात 24 तासात मृत्यू – 3,980
  • देशात 24 तासात डिस्चार्ज -3,29,113
  • एकूण रुग्ण – 2,10,77,410
  • एकूण मृत्यू – 2,30,168
  • एकूण डिस्चार्ज – 1,72,80,844
  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 35,66,398
  • आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या -16,25,13,339

हे सुद्धा वाचा;

News English Summary: The second wave of corona has caused havoc. The number of new corona patients in the country reached a record high on Wednesday. In the last 24 hours, 4 lakh 12 thousand 373 positive patients were found across the country, while 3,979 patients also died.

News English Title: India reports 412262 new COVID19 cases 329113 discharges and 3980 deaths in the last 24 hours as per Union Health Ministry news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1388)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x